Natural Disaster : नैसर्गिक आपत्तीत तीन वर्षांत ३२९ जणांचे बळी

Natural Disaster Update : नैसर्गिक आपत्ती वीज पडून, पुरात वाहून आणि इतर कारणांनी २०२१ ते २०२३ या तीन वर्षांत मराठवाड्यातील ३२९ जणांचे बळी गेले आहेत.
Natural Disaster
Natural Disaster Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : नैसर्गिक आपत्ती वीज पडून, पुरात वाहून आणि इतर कारणांनी २०२१ ते २०२३ या तीन वर्षांत मराठवाड्यातील ३२९ जणांचे बळी गेले आहेत. याशिवाय ४,४८५ जनावरांनाही आपला या नैसर्गिक आपत्ती जीव गमवावा लागला आहे. नैसर्गिक आपत्तीतील बळींची कारण बघता, येतोय पावसाळा जीव सांभाळा असंच सांगण्याची वेळ आली आहे.

मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीच्या निमित्ताने ही माहिती पुढे आली. नैसर्गिक आपत्तीत होणारी जीवित, वित्तीयहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची मांडणी आढावा बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आली. २०२१ मध्ये वीज पडून ५४ जणांचा, तर पुरात वाहून गेल्याने १०८ व इतर कारणांनी १५ जणांचा मृत्यू झाला. याच वर्षी वीज पडून ८१७, पुरात वाहून गेल्याने १३३४, तर इतर कारणांनी ७४ जनावरांचा ही मृत्यू झाला.

Natural Disaster
Disaster Management : आपत्ती व्यवस्थापनातून मिळणार १०० कोटी रुपये

२०२२ मध्ये ६८ जणांचा वीज पडून मृत्यू झाला, तर पुरात वाहून गेल्याने ३४ जणांचा व इतर कारणांनी ४ जणांचा मृत्यू झाला. याच वर्षी वीज पडून ७३७, पुरात वाहून गेल्याने ५३१, तर इतर कारणांनी २२ जनावरांचाही मृत्यू झाला. २०२३ मध्ये वीज पडून २७, पुरात वाहून गेल्याने १७, तर इतर कारणांनी ३ जणांचा मृत्यू झाला. याच वर्षी वीज पडून ७३२, पुरात वाहून गेल्याने २१० व इतर कारणांनी २८ जनावरांचा मृत्यू झाला होता.

ग्रामस्तरावर आपत्कालीन पूर्वतयारी प्रशिक्षण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांपैकी केवळ चार जिल्ह्यांत ग्राम स्तरावरील आपत्कालीन पूर्वतयारी प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ८३, परभणीतील ११८, हिंगोलीतील ६०, लातूरमधील ५० प्रशिक्षणाचा समावेश आहे. दुसरीकडे केवळ तीन जिल्ह्यांत मंडळ स्तरावरील प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यामध्ये जालन्यातील ४९, परभणीतील १८, हिंगोलीतील ३० प्रशिक्षणाचा समावेश आहे.

Natural Disaster
Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

तालुकास्तरावरील प्रशिक्षण मात्र धाराशिव वगळता सर्वच जिल्ह्यांत राबविण्यात आली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १३, जालन्यातील १६, परभणीतील ९, हिंगोलीतील १०, नांदेडमधील ९, बीडमधील ६, लातूरमधील १२ प्रशिक्षणाचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणही धाराशिव वगळता सर्वच जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील ३६, जालन्यातील ४, परभणीतील १, हिंगोली व नांदेडमधील प्रत्येकी ३, तसेच बीड व लातूरमधील प्रत्येकी ५ जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचा समावेश आहे.

४०७ पैकी ३९२ वीज अटकाव यंत्रणा सुरू

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात एकूण ४०७ वीज अटकाव यंत्रणा आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७९, जालन्यातील ३, परभणी ४, हिंगोलीत २, नांदेडमध्ये ४, बीडमध्ये ३०८, लातूरमध्ये ३, तर धाराशिवमधील चार वीज अटकाव यंत्रणांचा समावेश आहे. यापैकी ३९२ वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७९, हिंगोलीतील २, नांदेडमधील ४, बीडमधील ३००, लातूरमधील ३ व धाराशिवमधील ४ वीज अटकाव यंत्रणांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com