Arogyavardhini Center : लातूरच्या आठ आरोग्यवर्धिनीला राष्ट्रीय दर्जाचे गुणवत्ता मानांकन

National Quality Rating : यंदा राज्यात पहिल्यांदाच जिल्ह्यातील आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळाले आहे.
Arogyavardhini Center
Arogyavardhini CenterAgrowon
Published on
Updated on

Latur News : ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य संस्थांतून देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांचा दर्जा तसेच गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने २०१३ पासून राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस) उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये यंदा राज्यात पहिल्यांदाच जिल्ह्यातील आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. यामुळे केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांचा दर्जांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रातंर्गत एनक्यूएएससाठी विस्तृतपणे आठ विभागातंर्गत तपासणी केली जाते. सेवा तरतूद, रुग्णांचे हक्क, इनपुट, साहाय्य सेवा, क्लिनिकल केअर, संक्रमण नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन आणि परिणाम आदींबाबत सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील गुणवत्ता सुधारणे,

Arogyavardhini Center
New Governor : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन; हरिभाऊ बागडेंवर राजस्थानची जबाबदारी

तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांतर्गत गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये घ्यावयाची काळजी, नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा, बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य रोग व्यवस्थापन, किरकोळ घटकांसह साध्या आजाराचे व्यवस्थापन, असंसर्गजन्य रोग व्यवस्थापन, सामान्य नेत्ररोग आणि कान, नाक, घसा काळजी, मुख आरोग्य काळजी, वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा,

आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्याच्या आजारांचे व्यवस्थापन आदी सेवांबाबत दिलेल्या तपासणी सूचीमाणे केंद्रस्तरावरुन बाह्य मुल्यांकन करण्यात येते. मुल्यांकनानंतर सर्वाधिक गुणांवरून मानांकन देण्यात येते.

Arogyavardhini Center
Micronutrient : सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य, कमतरतेची लक्षणे

यंदा मानांकन मिळालेल्या केंद्रात उदगीर तालुक्यातील किणी यल्लादेवी, तोंडचीर, तोंडार, अवलकोंडा, लातूर तालुक्यातील पाखर सांगवी, अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा, औसा तालुक्यातील सारोळा, जळकोट तालुक्यातील घोणशी या केंद्रांचा समावेश आहे. हे मानांकन आरोग्य विभागातील सर्वोच्च दर्जाचे असून सर्व आरोग्यवर्धिनी केंद्राना सलग तीन वर्षे बारा सेवांसाठी प्रत्येकी १८ हजार रुपये याप्रमाणे दोन लाख १६ हजार रुपये पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. एन. डी. बोडके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. सी. पंडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बरुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. कापसे व जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पी. ए. रेड्डी यांनी यासाठी योगदान दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com