
Chana Farming Management :
शेतकरी नियोजन
पीक : हरभरा
शेतकरी : विनोद भोयर
गाव : सुदी, ता. मालेगाव, जि. वाशीम
एकूण क्षेत्र : ५७ एकर
हरभरा लागवड : १२ एकर
वाशीम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) येथील भोयर कुटुंबीयांकडे ५७ एकर शेती आहे. त्यापैकी १२ एकरांत यंदा सोयाबीन पीक काढणी झाल्यानंतर ६ नोव्हेंबरला हरभऱ्याची लागवड केली आहे. सध्या हरभरा पीक महिनाभराचे झाले आहे. दरवर्षी योग्य व्यवस्थापन करत हरभऱ्याचे एकरी ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. या वर्षी त्यांनी जॅकी ९२१८ या वाणाची लागवडीसाठी त्यांनी केली आहे. या वर्षी पीक मर रोगमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जात आहे.
लागवड नियोजन :
सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत केली. मशागतीनंतर सात ते आठ दिवस जमीन उन्हामध्ये तापू दिली. नंतर रोटाव्हेटर मारून जमीन भुसभुशीत केली.
दरवर्षी हरभरा लागवडीसाठी जॅकी ९२१८ या वाणाची लागवड केली जाते. त्यानुसार यंदाही या वाणाची लागवड केली आहे.
ट्रॅक्टरच्या साह्याने दोन तासांतील अंतर १५ इंच ठेवून पेरणी केली आहे. पेरणी साधारण ६ नोव्हेंबरच्या दरम्यान करण्यात आली. पेरणीसाठी एकरी २८ ते ३० किलोपर्यंत बियाणे पुरेसे होते.
पेरणीपूर्वी बियाणास शिफारशीत घटकांची बीजप्रक्रिया करून घेतली. बीजप्रक्रिया केल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
पेरणीवेळी डीएपी खताची मात्रा दिली. यामुळे चांगली उगवण झालेल्या पिकाला सुरुवातीपासूनच फायदा होण्यास मदत झाली असल्याचा विनोद भोयर यांचा अनुभव आहे.
आगामी नियोजन :
पिकाची उगवण जोमदार झाली असून पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.
आगामी काळात सूक्ष्म अन्नद्रव्ये व दुय्यम अन्नद्रव्ये दिली जातील. तसेच पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी शिफारशीत घटक दिले जातील.
पेरणी केल्यानंतर पिकामध्ये रानडुक्करांचा प्रादुर्भाव होतो. रानडुक्कर हरभरा उकरून खातात. यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
जमीन हलकी असल्याने पिकाला किमान चार ते पाच पाळ्या द्याव्या लागतात. पहिले पाणी जमिनीतील ओलावा पाहून दिले जाते. यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला. तीन ते चार तास स्प्रिंकलर चालविण्यात आले.
मर रोग नियंत्रणासाठी प्रयत्न :
मागील काही वर्षांत हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यावर्षी पीक मर रोगमुक्त ठेवण्यासाठी लागवडीवेळी बियाण्यास शिफारशीत घटकांची बीजप्रक्रिया केली. तसेच पीक २० दिवसांचे झाल्यानंतर रासायनिक घटकांची एक फवारणी घेतली आहे.
- विनोद भोयर, ९८२३८२३५३१
(शब्दांकन : गोपाल हागे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.