Uddhav Fad : लोकसहभागातून योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

Jaljeevan Mission Workshop : गावातील प्रत्येक योजनांची प्रभावीपणे लोकसहभागातून अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रमुख वक्ते तथा लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक उद्धव फड यांनी केले.
Uddhav Fad
Uddhav FadAgrowon

Nandurbar News : उद्याच्या विकसित व सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर गावात सरपंच, ग्रामसेवक यांना हातात हात घालून कामे करावी लागणार आहेत. पाणी व स्वच्छतेच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण झाल्यास खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतातील महात्मा गांधी यांनी पाहिलेले स्वयंपूर्ण खेड्यांचा भारत अस्तित्वात येईल.

यासाठी गावातील प्रत्येक योजनांची प्रभावीपणे लोकसहभागातून अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रमुख वक्ते तथा लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक उद्धव फड यांनी केले. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करणे करिता जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यावेळी श्री. फड बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्या हस्ते झाले.

Uddhav Fad
Free Ration Scheme : मोफत गहू, तांदळासोबत मिळणार बाजरी ; युपी सरकारचा निर्णय

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक एम.डी.धस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, पी. पी. कोकणी, सी.टी. गोस्वामी उपस्थित होते.

श्री. फड म्हणाले की, महात्मा गांधी, संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांनी भविष्यात निर्माण होणारा पाण्याचा तुटवडा ओळखून पाणी वाचविण्याच्या उपदेश त्याकाळी केला आहे. अनेक संस्थांच्या अहवालानुसार २०५० पर्यंत पाच माणसांमागे एक माणसाला पिण्याचे पाणी मिळणार नाही.

Uddhav Fad
Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या प्रचारासाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा

यामुळे पाणी योजनांचे प्रत्येक गावात योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र आल्यास गावाचा विकास शक्य आहे. असे केल्यास प्रत्येक गाव आदर्श होतील. यातून उद्याच्या भारत निर्माण होईल. असे झाल्यास संत तुकडोजी महाराज यांच्या ‘माझे गावच नाही का तीर्थ’ या उक्तीप्रमाणे गावे आदर्श होतील.

सभापती गावित म्हणाल्या, की गावात पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना पुढील ३० वर्षांचे नियोजन करून योजनेची आखणी करण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रती व्यक्तीला प्रतिदिन ५५ लिटर याप्रमाणे शुद्ध व नियमित पाणी मिळेल यासाठी गावात सुरू असलेल्या योजनांची तांत्रिकदृष्ट्या योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. श्री.धस यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com