Animal Husbandry : पशू संवर्धनातून आर्थिक उन्नती शक्य

Cow Conservation : शेतकऱ्यांनी शेती सोबतच पूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत गवळाऊ आणि देशी, संकरित जनावरांना जतन, संवर्धनसाठी उल्लेखनीय प्रयत्न होत आहेत.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Wardha News : शेतकऱ्यांनी शेती सोबतच पूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत गवळाऊ आणि देशी, संकरित जनावरांना जतन, संवर्धनसाठी उल्लेखनीय प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाची कास धरून उत्पन्न वाढीसाठी लक्ष देणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

स्वावलंबी मैदान, वर्धा येथे कृषी, पशुसंवर्धन व वर्धिनी महोत्सवामध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित गवळाऊ आणि देशी, संकरित, दुधाळ म्हैस, शेळीगट आणि कुक्कुट पक्षी तसेच गवळाऊ जनावरांच्या दुग्धस्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Animal Husbandry
Animal Husbandry : गोठ्यातील डासांचा त्रास झटक्यात करा कमी; 'हा' आहे साधा घरगुती उपाय

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार बीडकर, कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे तसेच निवड समितीतील तज्ज्ञ यांची उपस्थिती होती. पशुपालनातून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी पशुपालकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी यावेळी केले.

या प्रदर्शनीमध्ये ४१ गवळाऊ गायी, २५ गवळाऊ वळू, ३८ गवळाऊ कालवड, ४७ एचएफ, गीर, साहीवाल, कांक्रेज प्रजातीच्या गायी, १२ दुधाळ म्हैस, ४७ शेळ्या आणि बोकड तसेच २६ देशी कुक्कुट पक्षी अशा एकूण २३६ पशुपक्षांनी सहभाग नोंदविला होता. पशुपालकांनी गवळाऊ दुग्धस्पर्धेत २२ गायींचा सहभाग नोंदविला होता.

Animal Husbandry
Animal Husbandry Income : पशुपालनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती

पशू प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्यासाठी नागपूर येथील पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. संगीता निरगुळकर, डॉ. राजेश बळी तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. शशिकांत मांडेकर, डॉ. अमित लोहकरे आणि डॉ. नीलेश राठोड यांच्या सहा सदस्यीय निवड समितीने प्रत्येक जनावरांचे सखोल परीक्षण करून त्यामधील २५ पशुपक्षांची निवड केली.

प्रदर्शनीला उपस्थित सर्व पशुपक्षांमधून अत्यंत उत्कृष्ट ठरलेल्या खरांगणा (मो) येथील देवानंद गळहाट यांच्या गवळाऊ कालवडीला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ट्राफीने सन्मानित करण्यात आले. तसेच गवळाऊ कालवड गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे देवानंद गळहाट, भोजराज अरबट व सचिन अवथळे, गवळाऊ गाय गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे गौरव गळहाट, देवीदास राऊत, प्रवीण कोरडे, गवळाऊ वळू गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते प्रशुपालक अनुक्रमे रूपेश अरबट, संजय गळहाट, संजय अवथळे, गवळाऊ दुग्धस्पर्धेतून गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे विजय गळहाट, अभय कालोकार, संजय गळहाट,

दुधाळ देशी व संकरित गाय गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे प्रतीक ठाकरे, सुभाष भुजाडे, प्रवीण साठे, दुधाळ मुऱ्हा व सुरती म्हैस गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे श्रीकांत पाटील, राहुल ठाकरे, नीतेश ठाकरे, शेळी व बोकड गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे शुभम दारुंडे, राजू शंभरकर, राजेश शिंदे तसेच देशी कुक्कुट पक्षी गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेते पशुपालक अनुक्रमे ऋषीकेश जामखुटे, चंद्रकांत कळस्कर, पारितोष राऊत यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र तसेच पशू प्रदर्शनी व गवळाऊ दुग्धप्रदर्शनीमध्ये एकूण २ लाख ६७ हजारांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पशुधन विकास अधिकारी डॉ. बि. व्ही. वंजारी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com