Aslam Abdul Shanedivan
आपल्याकडे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून सध्या हा व्यवसाय अडचणीत येत आहे.
यात डास, माशा, गोमाशा, उवा, लिखा, आणि गोचीड या कीटकांच्या त्रासाने जनावरे अधिक आजारी पडत आहेत
त्यामुळे या कीटकांमुळे दुग्धव्यवसाय, शेळीपालनाच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे
यावर पशुवैद्यकी तज्ज्ञांच्या सल्लाने कमी खर्चात गोचीड आणि माशांसारख्या इतर किटकांवर मात करता येणार आहे.
गोठ्यामध्ये सर्वाधिक त्रास हा जनावरांना गोचिडामुळे होत असून जनावरांच्या शरिरात सुधारणा होत नाही.
गोठ्यातील किटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी लिंबाचे तेल आणि करंज तेलाचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा.
हे ते गायी, म्हैस किंवा शेळीच्या अंगावर फवारावे, नाही तर गोठ्यामध्ये १० फूट अंतर सोडून फवारावे याचा फायदा होईल