Animal Husbandry Income : पशुपालनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती

Dr. Sunil Tumbare : पशुपालनात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर मूल्यसाखळी विकसित होऊन चांगली बाजारपेठ मिळवणे शक्य असून, यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असे मत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी व्यक्त केले.
Dr. Sunil Tumbare
Dr. Sunil TumbareAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शेतीतून पिकणाऱ्या उत्पन्नाला योग्य बाजारभाव मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र पशुपालन व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. पशुपालनात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर मूल्यसाखळी विकसित होऊन चांगली बाजारपेठ मिळवणे शक्य असून, यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असे मत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी व्यक्त केले.

तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे मूल्यसाखळी विकास शाळा व उत्पादन तंत्रज्ञान बाजार संमेलन झाले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रियंका तोंडे, सहायक आयुक्त डॉ. रामदास गाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dr. Sunil Tumbare
Animal Husbandry Business : नव्या जोमाने पुन्हा उभारला पशुपालन व्यवसाय

डॉ. तुंबारे म्हणाले, की शासकीय योजनांसाठी संबंधित व्यवसायातील प्रशिक्षण आवश्यक असते. संबंधित प्रशिक्षण जिल्हा अथवा पशू महाविद्यालयात उपलब्ध असते. मात्र परिसरातील आठ ते १० शेतकरी एकत्र आले तर हे प्रशिक्षण पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या वेळी शेळीपालन व्यवसायात कृत्रिम रेतन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले. शेळीपालनात नवीन तंत्रज्ञान कसे वापरून उत्पन्नात वाढ केली पाहिजे याची माहिती या वेळी दिली. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी शेळीच्या दुधाला आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या मागणीचे महत्त्व सांगितले.

Dr. Sunil Tumbare
Animal Husbandry : पशुपालन क्षेत्रातील समस्यांवर सांघिकपणे मात करा

या वेळी त्यांनी विद्यापीठात शेळीच्या दुधावर सुरू असलेले संशोधन उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. विद्यापीठाच्या माध्यमातून शेळीच्या दुधापासून साबण निर्मितीवर संशोधन सुरू असून, त्याला बाजारात मोठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. हे संशोधन शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.

डॉ. विठ्ठल विखे व डॉ. सोमनाथ भास्कर यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ कसा घ्यायचा याबद्दलची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली. प्रास्ताविक सहायक आयुक्त डॉ. रामदास गाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन सुखलाल गांगवे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com