Paddy Plantation : भात पट्ट्यात पेरण्या रखडल्या

Paddy Farming : सध्या पावसाने काही दिवस विश्रांती घेतली व भात खाचरातील पाणी कमी होताच पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकरी वर्गाची कामे सुरू झाली.
Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा मॉन्सून मे महिन्यात दाखल झाला आहे. प्रामुख्याने मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनचा पाऊस १५ मे ते ३१ मेपर्यंत सतत पडत राहिल्याने भात पट्ट्यातील तालुक्यातील ६० ते ७० टक्के भागात भात पेरण्या रखडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले.

सध्या पावसाने काही दिवस विश्रांती घेतली व भात खाचरातील पाणी कमी होताच पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकरी वर्गाची कामे सुरू झाली. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून भात पेरणी लांबण्याची शक्यता अधिक आहे. तर काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे. तिथे कुदळीने उकरून भात पेरणी करण्यास काहींनी सुरुवात केली आहे.

मावळ, मुळशी, भोर, राजगड, खेड, जुन्नर व आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी धूळ वाफेवर भात पेरणी केली जाते. तर काही ठिकाणी मॉन्सून अगोदर येणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीनंतर अंदाज घेऊन पेरणी केली जाते. मात्र, यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांना भात पेरणी करण्यासाठी संधीच मिळाली नाही.

भात पट्ट्यातील तालुक्यामध्ये इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. यंदा मुसळधार पडलेल्या पावसामुळे भात खाचरे तुडुंब भरली असून पाऊस थांबल्याशिवाय भात पेरणी करता येणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Paddy Plantation
Kharif Sowing : खानदेशात धूळपेरणी अल्प

शिवाय भात खाचरातील पाणी कमी होणे गरजेचे आहे. तर राजगड तालुक्याच्या आठरागाव मावळ भागामध्ये १५ मे अगोदरच भात पेरणी बऱ्यापैकी पूर्ण झाली असून शेतकरी शेतीच्या अन्य कामांमध्ये गुंतला आहे. या ठिकाणी पाऊस असाच राहिला तर लवकरच भात लावणीला सुरुवात होऊ शकते.

Paddy Plantation
Kharif Sowing : पारोळ्यात ३२ हजार हेक्टर क्षेत्रात कोरडवाहू पिके पेरणीची प्रतीक्षा

भात पट्टा हा इंद्रायणी तांदळाची पंढरी म्हणून ओळखला जातो. या तांदळाबरोबरच अन्य काही जातींच्या तांदळाचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते. त्याचचरोबर नाचणी, वरई अशा काही प्रमुख पिकांची लागवड करण्यात येते. याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत मागणी असते.

तर लोणच्यासाठीचा लागणारा रायवळ आंबा (कैरी), फणस, लागवड केलेला हापूस आंबा, जांभूळ, करवंद याचे उत्पादन या भागात मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आंब्याबरोबरच इतर फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राजगड तालुक्यात सर्वत्र धूळ वाफेवर भात पेरणी होत असते. मात्र, यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे अंदाजे चुकले आहेत. सध्या शेतकरी पाणी कमी असलेल्या ठिकाणी भात पेरणी करीत आहे. ही पेरणी उशिरा होणार असल्याने भात काढणीसुद्धा उशिरा होऊ शकते व बाजारात ग्राह‌कांच्या आवडीचा इंद्रायणी तांदूळ यायला पण उशीर होणार असल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
- श्रीरंग कोंढाळकर, भात उत्पादक, कांबरे खेबा, भोर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com