e-Sanjeevani OPD : ‘ई-संजीवनी ओपीडी’मुळे एक लाखांहून अधिक रुग्णांना सेवा

Telemedicine : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत टेलिमेडिसिनद्वारे ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू केली.
e-Sanjeevani OPD
e-Sanjeevani OPD Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत टेलिमेडिसिनद्वारे ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू केली. जिल्ह्यात ऑगस्ट २०२० पासून १ लाख ७४ हजार रुग्णांनी या योजनेचा लाभ घेत घर बसल्या मोफत आरोग्य सल्ला घेतला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सेवा २१ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाली. त्यासाठी ६ संगणकांचा कक्ष सुरू करण्यात आला. त्याद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांना टेलि-कन्सल्टेशनद्वारे जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिव्यंगोपचार, कान, नाक, घसा, बालरोग, नेत्ररोग, मानसोपचार तज्ज्ञांकडून सेवा दिली जाते.

e-Sanjeevani OPD
Solkadhi Health Benefits : कोकणातील प्रसिद्ध पेय पिल्यास होतील अनेक आजार दूर

आतापर्यंत २० हजार वरून अधिक रुग्णांना यांना थेट इ-संजीवनी ओपीडी ॲप तसेच पोर्टलच्या माध्यामातून कॉल्स करता आले. महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे मोबाइल नाहीत अशा रुग्णांनी सुद्धा जवळील केंद्रात जाऊन अधिकाऱ्यांच्या पोर्टल वर नोंद करून तज्ज्ञांकडून आरोग्य विषयक ऑनलाइन सल्ला घेतला, असे ई-संजीवनीचे नोडल अधिकारी डॉ. भारती नागरे व समन्वयक सोहन ठोंबरे यांनी सांगितले.

e-Sanjeevani OPD
Human Health : कधीच मिसळून खाऊ नका हे पदार्थ

या ॲपच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करता येते. त्यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in या संकेतस्थळावर किंवा esanjeevani-MoHFW हे ॲप डाउनलोड करून स्वतः नोंदणी करावी. आपले आरोग्यासंबंधीचे कागदपत्र अपलोड करावे. त्यानंतर टोकन जनरेट होईल.

ई-संजीवनी ओपीडीला गेल्या ४ वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रुग्णांना थेट तज्ज्ञांची सेवा या टेलिकन्सल्टेशनद्वारे मोफत मिळते. त्याचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घरातील इतर सदस्यांना सुद्धा यात सहभागी करून घ्यावे. सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अधिकाधिक रुग्णांनी घरबसल्या या निःशुल्क ऑनलाइन सल्लासुविधेचा लाभ घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com