Human Health : कधीच मिसळून खाऊ नका हे पदार्थ

Team Agrowon

जेवताना लोक कोणत्याही प्रकारचे अन्न, भाज्या किंवा फळे एकत्र एकत्र करतात. त्यामुळे पचन प्रक्रिया विस्कळीत होते, पोटात अपचन वाढते आणि अस्वस्थता येते.

Human Health | Agrowon

मटण, चिकन, मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. वास्तविक, दुधात असलेले गुणधर्म हे चिकन आणि माशांच्या अगदी विरुद्ध आहेत. हे मांसाहारी पदार्थ उष्णता वाढविणारे आहेत, दूध हे थंड असते. हे या गोष्टी एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्‌भवू शकतात.

Human Health | Agrowon

दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे इ. खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते.

Human Health | Agrowon

फणस किंवा तळलेले पदार्थपण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.

Human Health

दूध, दह्यासोबत फळे खाल्ल्यास कफ वाढतो. ज्यूस सेंटरवर सामान्यतः प्रत्येक फळाचा रस बनविताना दूध मिसळले जाते. अशा प्रकारे केलेल्या अनारोग्यकारक मिश्रण पिण्यामध्ये आल्यामुळे कफ वाढतो.

Human Health | Agrowon

थंड आणि गरम पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. उदा. गरम जेवणानंतर आइस्क्रीम खाणे, हे विरुद्ध आहे. चहा पिल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे त्वचा विकार होतात.

Human Health | Agrowon

तूप आणि मध समप्रमाणात कधीही घेऊ नये, त्यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात. तूप आणि मधाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा आहे. मधामध्ये उष्णता, कोरडेपणा, तर तुपामध्ये थंडावा, ओलावा देणारे गुणधर्म असतात.

Human Health | Agrowon
आणखी पाहा...