sandeep Shirguppe
कोकण, मालवणातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे सोलकढी ही असतेच. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
नारळाचे दूध व कोकमाचा सार याचं मिश्रण म्हणजे सोलकढी.
वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक समस्यांवर सोलकढी उत्तम आहे.
सोलकढीमध्ये असलेल्या कोकमात अॅन्टीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक असतात.
ओल्या नारळात प्रथिने, व्हिटॅमिन-सी, खनिजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.
सोलकढी अॅन्टीऑक्सिडंट असतं त्वचा सतेज होते. सुरकुत्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
कोकमातील खनिजांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
मांसाहारासारखे पचायला जड पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढीचे सेवन केले जाते.