

Esakal Paper : पुणेः डिजिटल माध्यमात आघाडीवर असलेल्या ई सकाळने विश्वासार्ह आणि अद्ययावत माहीती वाचकांपर्यंत पोचवण्याचा २५ वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. वाचकांमध्ये विश्वास कायम ठेवत ई सकाळने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. ई सकाळच्या या यशात आणखी भर पडली असून, कॉमस्कोर रेटिंगनुसार भारतातील नंबर १ मराठी वेबसाइटचा बहुमान ई सकाळला मिळाला आहे.
गेल्या अडीच दशकांमध्ये ई-सकाळचा प्रवास नावीन्यपूर्णता आणि विश्वासाने भरलेला आहे. दर्जेदार आणि विश्वासार्ह पत्रकारितेसाठी नावलौकीक मिळवला आहे. ई सकाळने या प्रवासात अनेक आव्हाने यशाचे शिखर गाठले आहे.
राजकारण, समाजकारण मनोरंजन, आरोग्य, शेती, तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रातील घडामोडींची अचूक माहीती वाचकांपर्यंत ई सकाळने पोचवली. वाचकांना खात्रीशीर आणि अचूनक माहीती मिळावी, याची काळजी सकाळने नेहमीच घेतली आहे.
ई सकाळच्या शिरपेचात आता यशाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कॉमस्कोरच्या ताज्या अहवालात ई सकाळच मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे स्पष्ट झाले. कॉमस्कोर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त विश्लेषण करणारी यंत्रणा आहे जी ट्रॅफिक आणि एंगेजमेंटच्या आधारे डिजिटल प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन करते. ई-सकाळचे अव्वल स्थान मराठी डिजिटल बातम्यांच्या क्षेत्रात त्याचे वर्चस्व दर्शवते.
ई सकाळने वाचकांना केंद्रस्थानी ठेऊन डिजिटल माध्यमात गेली २५ वर्षे काम केले आहे. अचूक आणि विश्वासार्ह बातम्या वाचकांपर्यंत पोचवल्या. अर्थव्यवस्था, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, आरोग्य आणि शेतीची प्रत्येक बातमी वेळेत वाचकांना उपलब्ध करून दिली. वाचकांप्रती कायम वचनबद्धता पाळल्याने ई सकाळला देशातील नंबर १ मराठी वेबसाई होण्याचा बहुमान मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.