E-Payment Facility : ‘ई-नाम’मध्ये अडत्यांना ई-पेमेंटची सुविधा

E-Naam Scheme : देश पातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारीत ‘ई-नाम’ योजनेत आता अडत्यांसाठी वजनाची पावती तयार करणे, सेल ॲग्रिमेंट व सेल बिल तयार करणे, शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणे, डॅशबोर्डद्वारे सुरू असलेले ई-लिलाव पाहणे या सुविधांचा नव्याने ई-नाम संगणक प्रणालीमध्ये समावेश करून त्या कार्यान्वित केल्या आहेत.
E-Payment
E-Payment Agrowon
Published on
Updated on

Pune News : देश पातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारीत ‘ई-नाम’ योजनेत आता अडत्यांसाठी वजनाची पावती तयार करणे, सेल ॲग्रिमेंट व सेल बिल तयार करणे, शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणे, डॅशबोर्डद्वारे सुरू असलेले ई-लिलाव पाहणे या सुविधांचा नव्याने ई-नाम संगणक प्रणालीमध्ये समावेश करून त्या कार्यान्वित केल्या आहेत, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. याबाबत आडत्यांना ई-नाम संगणक प्रणालीमध्ये ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती देताना कदम म्हणाले, ‘‘राज्यात आतापर्यंत ई-नाम बाजार समित्यांमध्ये एकूण ४७६ लाख क्विंटल शेतीमालाचा ई-लिलाव झाला असून त्याची किंमत सुमारे १७ कोटी आहे. ई-लिलावाद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर, उडीद, कांदा, डाळिंब, कोबी, रेशीम कोश या शेतीमालांची प्रामुख्याने विक्री करण्यात येते. शेतीमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ११८ बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित असून एकूण १६.३८ लाख लॉट्सचे असेईंग करण्यात आले आहे. ‘ई-नाम’च्या ई-पेमेंट सुविधेद्वारे शेतकऱ्यांना ४४५ कोटी इतकी रक्कम व्यापाऱ्यांनी ऑनलाइन अदा केली आहे.’’

‘‘अडत्यांसाठी ‘ई-नाम’मध्ये नव्याने दिलेल्या सुविधांबाबत राज्यातील ई-नाम बाजार समित्यांचे सचिव व आडते यांना ऑनलाइन सभेद्वारे माहिती देण्यात आली आहे.

E-Payment
eNAM Farmer Benefits : ‘ई-नाम’मुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा : कटरे

दृष्टिक्षेपात ‘ई-नाम’

११८ बाजार समित्यांमध्ये ई-ऑक्शन सुरू

शेतकरी नोंदणी - १२ लाख २९ हजार

एकूण ४७६ लाख क्विंटल मालाची खरेदी विक्री, त्यातून सुमारे १७ कोटींची उलाढाल

शेतीमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ११८ बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित

११० बाजार समित्यां|मध्ये असेईंग सुरू, एकूण १६ लाख ३८ हजार लॉट्सचे असेईंग

७८ बाजार समित्यांमध्ये ई-पेमेंट सुरू, त्यातून सुमारे ४४५ कोटींचा व्यवहार

खरेदीदार (व्यापारी) नोंदणी २२ हजार ३६६

E-Payment
Agriculture Products : शेतीमाल खरेदी-विक्रीत ‘ई-नाम’मुळे पारदर्शकता

आडते नोंदणी १७ हजार ८७४

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी ३४१

आंतरबाजार समिती व्यापार २.६६ लाख क्विंटल, सुमारे १४० कोटी ८७ लाखांची उलाढाल

आंतरराज्य व्यापारातून १ लाख ५० हजार क्विंटलची खरेदी-विक्री तर ३२ कोटी २६ लाखांची उलाढाल

शेतकरी उत्पादक कंपनी ८ हजार ९४२ क्विंटल खरेदी-विक्रीतून ४ कोटी ९ लाखांची उलाढाल

प्रतिलॉट बोली लावण्याचे सरासरी प्रमाण ५.५२

एकूण ग्रामसभा १ हजार ८२८

केंद्र शासनाने ‘ई-नाम’मध्ये आडत्यांसाठी वजनाची पावती तयार करणे, सेल ॲग्रिमेंट व सेल बिल तयार करणे, शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणे, डॅशबोर्डद्वारे सुरू असलेले ई-लिलाव पाहणे या सुविधा नव्याने सुरू केल्यामुळे ई-नामअंतर्गत आडत्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. ई-नामअंतर्गत आडत्यांसाठी नव्याने उपलब्ध सुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त व्यवहार ‘ई-नाम’अंतर्गत करावेत जेणेकरून शेतकऱ्यास रास्त भाव मिळण्यास मदत होईल.
संजय कदम, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com