Turmeric Market : परभणीत लिलावाद्वारे हळद खरेदी-विक्री सुरू करणार

Turmeric Auction Market : सभापती पंढरीनाथ घुले ः बाजार समितीची सर्वसाधारण सभा
Turmeric Market
Turmeric Market Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी ः कृषी उत्पन्न समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांतील शेतकरीनिहाय हळद लागवड क्षेत्राची माहिती संकलित करण्यात आली आहे. लवकरच बाजार समितीच्या मार्केट यार्डात जाहीर लिलावाद्वारे हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत. चालु आर्थिक वर्षात शेतीमाल तारणकर्ज योजनेसाठी १ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या सभागृहात घुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ३०) पार पडली. या वेळी ते बोलत होते. बाजार समितीचे उपसभापती अजय चव्हाण, माजी उपसभापती मुंजाजी जवंजाळ, संचालक अरविंद देशमुख, गणेश घाटगे, घनश्याम कनके, सोपान मोरे, विनोद लोहगावकर, रावसाहेब रेंगे, फैजुल्ला खान पठाण, सचिव संजय तळणीकर आदी उपस्थित होते.

Turmeric Market
Onion Market : परभणीत शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करा

घुले म्हणाले, की बाजार समितीचे वर्ष२०२२-२३ पर्यंतचे लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. बाजार समिती ही शेतकरी व्यापारी व इतर संबंधित घटकांच्या फायद्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. कॉटन टेक्नॉलॉजी मिशनअंतर्गत स्थापन स्वतंत्र कॉटन मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी केली जाते. राष्ट्रीय कृषी बाजार (ईः नाम) अंतर्गत ई-लिलावाद्वारे खरेदी केलेल्या शेतीमालाची रक्कम आनलाइन, आरटीजीएसद्वारे २४ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. मुख्य बाजार आवारात धान्यचाळणी यंत्र कार्यान्वित केले असून सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, ज्वारी आदी शेतीमाल शेतकऱ्यांना माफक दरात चाळणी करून दिला जात आहे.

स्वनिधीतून सुरू केलेल्या शेतीमाल तारणकर्ज योजनेत यावर्षी सोयाबीन, तूर, हरभरा या शेतीमालासाठी ३७ शेतकऱ्यांना ५९ लाख २० हजार रुपये कर्जवाटप केले आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे परभणी येथे सीसीआयचे (भारतीय कापूस महामंडळ) खरेदी केंद्र सुरू होणार आहे. परभणी येथील टीएमसी मार्केट यार्डात नवीन शेतीमाल लिलावगृह, रस्ते, दैठणा व पेडगाव येथील उपबाजारात जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, टेक्सटाईल्स पार्क, ऑईल इंडस्ट्रीज, स्वतंत्र भुसार मार्केट आदी प्रकल्प उभारणीबाबत विकास आराखडा करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com