Crop Damage Compensation : बीडमध्ये ७२ हजार ४१० लाभार्थ्यांची ई- केवायसी बाकी

Crop Damage : या अनुदानाचे संगणकीय प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरण सुरू आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon

Beed News : जिल्ह्यात सद्यःस्थितीत १ लाख ८० हजार ७९६ लाभार्थ्यांपैकी ७२ हजार ४१० लाभार्थ्यांनी ग्रामस्तरावर प्रसिद्ध झालेल्या विशिष्ट क्रमांक यादी लिस्टमधील अनुक्रमांकनुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण (ई- केवायसी) करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि मार्च, एप्रिल २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे व दुष्काळ २०२३ मध्ये झालेले शेतीपिकांचे नुकसानीपोटी बीड जिल्ह्यातील ९६४८०४ बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये ७१७.०९ कोटी अनुदान मंजूर झाले आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Survey : पंचनाम्यांच्या फेरचौकशीसाठी विमा अधिकारी तळ ठोकून

या अनुदानाचे संगणकीय प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरण सुरू आहे. जिल्ह्यातील ६ लाख ८२ हजार ८१२ शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रुपये ५६८.५२ कोटी अनुदानाचे वितरण झाले असून, उर्वरित २ लाख ८१ हजार ९९२ शेतकरी लाभार्थ्यांपैकी १ लाख ०१ हजार १९६ लाभार्थ्यांच्या माहिती संबंधी दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी (आधार सेंटरवर जाऊन) -BActiveकरून घेणे व बँक खात्यास आधार मॅपिंग करणे आवश्यक आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी व्हीके नंबरनुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण (ई केवायसी) तात्काळ करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Survey : खानदेशात वादळात नुकसानीचे पंचनामे सुरूच

अंबाजोगाई, वडवणी व धारूर या तालुक्यात खरीप २०२३ मध्ये दुष्काळ घोषित झाला असून, या तालुक्यात ११ हजार ०८९ शेतकरी लाभार्थ्यांनी आपली माहिती (आधार कार्ड व बॅक पासबुकची प्रत) संबंधित गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ई- केवायसी आवश्यक

तालुकानिहाय संख्या

अंबाजोगाई ११६७३

बीड ११०००

आष्टी ७१६६

धारूर ७०१८

माजलगाव ६९२६

केज ६८३३

पाटोदा ५६३४

शिरूर कासार ४७१९

वडवणी ४४८५

गेवराई ४२७७

परळी २६७९

एकूण ७२४१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com