Agriculture Education : डी. वाय. पाटील विद्यापीठामुळे कृषी शिक्षणाची गंगा अवतरली

Dr. D.Y.Patil University : केवळ माळरान असलेल्या या शेतीत आज विद्यापीठाच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने कृषी शिक्षणाची गंगा अवतरली आहे. अनोख्या कामामुळे विद्यापीठ एक दिवस देशातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ बनेल.’’
Dr. D.Y.Patil University
Dr. D.Y.Patil UniversityAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ‘‘शेतीनिष्ठा दाखवत डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने शेतीचे विद्यार्थी घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. केवळ माळरान असलेल्या या शेतीत आज विद्यापीठाच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने कृषी शिक्षणाची गंगा अवतरली आहे. अनोख्या कामामुळे विद्यापीठ एक दिवस देशातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ बनेल,’’ असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तळसंदे (ता. हातकणंगले) येथे सोमवारी व्यक्त केला. विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान सभारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कृषी क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल ‘सकाळ-ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांचा डी. लिट., तर जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अनिल जैन यांचा डी. एस्सी. ही मानद पदवी देऊन श्री. सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कुलगुरू डॉ. ए. के. प्रथापन, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत या वेळी उपस्थित होते. या वेळी ६६१ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

Dr. D.Y.Patil University
Adinath Chavan : डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाची आदिनाथ चव्हाण यांना डी. लिट

श्री सामंत म्हणाले, ‘‘डी. वाय. पाटील ग्रुप हा राजकारण विरहित संबंध जोपासणारा ग्रुप आहे. डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ग्रुपचे काम सुरू आहे. अतिशय नम्रपणे आणि निष्ठेने कृषी विस्ताराचे काम डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपने केले. त्यांचे हे कार्य नक्कीच आदर्शवत आहे. इतर विद्यापीठांसाठी भविष्यात हे विद्यापीठ एक दीपस्तंभ बनेल.’’

डॉ पाटील म्हणाले, ‘‘शेतीच्या आवडीतूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तळसंगेच्या माळरानावर आम्ही शेती फुलवली. शेती करता करता या जागेवर शिक्षणाची गंगाच उभी राहिली. यातून लाखो विद्यार्थी घडत गेले याचा मोठा आनंद आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले कृषी विद्यापीठ आज एक नामांकित विद्यापीठ म्हणून नावारूपास येत आहे आणि याचा लाभ बहुतांशी स्थानिक विद्यार्थी घेत आहेत.’’

Dr. D.Y.Patil University
Adinath Chavan : संघर्षाला हवा प्रबोधनाचा आधार

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘देशातील पहिल्या खासगी कृषी विद्यापीठाने जगातील पहिल्या कृषी दैनिकाच्या संपादकांना दिलेली डी. लिट. हा शेतकऱ्यांचा सन्मान आहे. ज्याप्रमाणे डी. वाय. पाटील ग्रुपने छोट्या-छोट्या व्यवस्थापनातून शेती ज्ञानाची गंगा फुलवली, अगदी त्याच प्रमाणे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मागे ‘ॲग्रोवन’ खंबीरपणे उभा राहिला. तो त्यांचा साथी बनला. ‘ॲग्रोवन’मुळे विकास साधलेल्या शेतकऱ्यांनी तर घराला ‘ॲग्रोवन’ हे नाव देऊन या वृत्तपत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली.’’

श्री जैन म्हणाले, ‘‘सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत जैन उद्योग समूहाने गेल्या काही वर्षांपासून शेती क्षेत्रात मोठी प्रगती केली. यासाठी नवीन तंत्रज्ञान मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची गरज यावर फोकस ठेवला. यामुळेच आज जगातील अनेक देशांमध्ये जैन ठिबकचे तंत्रज्ञान वापरले जात आहे, याचा मोठा आनंद आहे.’’

‘ॲग्रोवन’च्या कार्याचा गौरव

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या ‘ॲग्रोवन’च्या कार्याचा उल्लेख सर्वच वक्त्यांनी केला. ‘ॲग्रोवन’चे काम निश्चितच शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे असल्याचे अनेक वक्त्यांनी आवर्जून नमूद केले. शेतकऱ्याप्रती कृतज्ञता दाखवत ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक श्री. चव्हाण आणि जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष श्री. जैन या दोघांनीही विद्यापीठाने सन्मानपूर्वक दिलेल्या पदव्या शेतकऱ्यांना समर्पित करत असल्याचे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com