Adinath Chavan : डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाची आदिनाथ चव्हाण यांना डी. लिट

Daily Agrowon Editor In Chief Adinath Chavan : कृषी क्षेत्रासाठी वाहिलेल्या देशातील एकमेव अशा दैनिक ‘ॲग्रोवन’च्या संपादकपदाची धुरा ते गेली १५ वर्षे सांभाळत आहेत.
Adinath Chavan
Adinath Chavanagrowon
Published on
Updated on

Sakal Agrowon Chief : कृषी पत्रकारितेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांना डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) पदवी जाहीर केली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात श्री. चव्हाण यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी फुलविण्यात ‘ॲग्रोवन’चा मोलाचा वाटा आहे. या वृत्तपत्राच्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजवर राज्यातील पाच शेतकऱ्यांनी स्वतःच्या घराला ‘ॲग्रोवन’चे नाव दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील एका शेतकरी कुटुंबाचे सुपूत्र असलेले श्री. चव्हाण गेल्या साडेतीन दशकांपासून पत्रकारितेत आहेत. सकाळ माध्यम समूहात बातमीदारीपासून सुरवात करून विविध संपादकीय पदांवर त्यांनी काम केले. कृषी क्षेत्रासाठी वाहिलेल्या देशातील एकमेव अशा दैनिक ‘ॲग्रोवन’च्या संपादकपदाची धुरा ते गेली १५ वर्षे सांभाळत आहेत.

या काळात अनेक नवनवे उपक्रम राबवून शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. वृत्तपत्रीय लिखाणाबरोबरच ललित लिखाणातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. शेतकरी वाचकांना जागतिक अभिजात साहित्याचा रसिला परिचय करून देणारे सदर त्यांनी ‘ॲग्रोवन'मध्ये चालवले. या लेखांचे संकलन असलेले 'वाचनवाटा' हे पुस्तकही सकाळ प्रकाशनतर्फे जून २०२३ मध्ये प्रकाशित झाले आहे.

Adinath Chavan
Adinath Chavan : संघर्षाला हवा प्रबोधनाचा आधार

सन २०२१ मध्ये स्थापन झालेले डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ हे देशातील पहिले मान्यताप्राप्त खासगी विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने श्री. चव्हाण यांची डी. लिट. या सन्मानदर्शक पदवीसाठी निवड केल्याची माहिती कुलगुरू प्रो. डॉ. के. प्रथापन यांनी पत्राद्वारे दिली आहे. विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा सोमवारी (७ ऑक्टोबर) तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील विद्यापीठाच्या प्रांगणात होत असून यावेळी सन्मानदर्शक पदव्यांबरोबरच सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com