Vegetable Market : सांगलीत वांग्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर

Brinjal Rate : गेल्या आठवड्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने वांगी पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बाजारात वांग्याची आवक मंदावली आहे.
Vegetable Market Rate
Vegetable Market Rateagrowon
Published on
Updated on

Samgki News : येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २९) वांग्याची ९० बॉक्सची (एक बॉक्स २० किलोचे) आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत कवठेमहांकाळ, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून वांग्याची आवक होते. बुधवारी (ता. २८) वांग्याची ८० बॉक्सची आवक झाली. वांग्यास प्रति दहा किलोस २७० ते ३७० रुपये असा दर मिळाला.

Vegetable Market Rate
Vegetable Market : मागणी वाढल्याने वांगी दरात सुधारणा

मंगळवारी (ता. २७) वांग्याची ९० बॉक्स आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३५० रुपये दर होता. सोमवारी (ता. २६) वांग्याची ७० बॉक्स आवक झाली. वांग्यास प्रतिदहा किलोस २८० ते ३५० रुपये दर मिळाला. रविवारी (ता. २५) वांग्याची ९० बॉक्स आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३५० रुपये दर होता.

Vegetable Market Rate
Vegetable Market : पावसाळी भाज्यांना चांगली मागणी

गेल्या आठवड्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने वांगी पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बाजारात वांग्याची आवक मंदावली आहे. पुढील सप्ताहात वांग्याची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला.

कोल्हापुरात १००० ते ३००० रुपये

कोल्हापूर : येथील बाजार समितीत वांग्यास दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळत आहे. वांग्याची दररोज ९०० ते १००० बॉक्स आवक होत आहे. बाजार समितीत शिरोळ, हातकणंगलेबरोबरच कर्नाटकातूनही वांग्याची सातत्याने आवक होते. गेल्या काही दिवसांपासून वांग्याच्या आवकेत थोडी वाढ असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दर मात्र टिकून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com