Team Agrowon
गावातील ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती असताना त्यासाठी आवश्यक असणारे हवामान केंद्र मात्र दिसत नाही.
ज्या ठिकाणी विशेषतः कृषी विज्ञान केंद्रांनी स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले आहे. तेथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळते.
बाजारात साधारण स्थानिक हवामान केंद्राची किंमत पस्तीस हजारांपासून एक ते दीड लाखापर्यंत आहे. या हवामान केंद्रामधील सर्व नोंदी दर दहा मिनिटाला स्वयंचलित पद्धतीने घेतल्या जातात.
मोबाईलचे सीम कार्ड टाकले तर हव्या तेवढ्या लोकांना या नोंदी मोफत पोहोचू शकतात.
गावचे शिवार कमीत कमी पाचशे हेक्टरपर्यंत असते. म्हणजे ग्रामपंचायतीने एक हवामान केंद्र उभारले तर खर्च विभागून तीनशे रुपये प्रति हेक्टर येईल.
हवामान केंद्राने नोंदविलेल्या माहितीचा उपयोग योग्य कृषी सल्लागाराची मदत घेऊन केला तर याचा शेती आणि उत्पादनात भरपूर उपयोग होतो.
स्मार्ट शेतीचा हवामान केंद्र हा पहिला पाया आहे. हा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक ग्रामपंचायतीने शासन योजना, अनुदानाची वाट न बघता आपल्या गावात हवामान केंद्र त्वरित बसवून स्मार्ट शेती करायलाच हवी