Drought Crisis : आमच्या जीवनाचा यंदा बेरंग झालाय...

Maharashtra Drought Update : रंगसंगतीसाठी नागपुरी संत्री ओळखला जात असली तरी, भाव नसल्याने यंदा मात्र आमच्या जीवनाचा बेरंग झाल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.
Drought Condition
Drought ConditionAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्यातून झालेली फळगळ आता बांगलादेशाने केलेली आयात शुल्कात वाढ, शुल्क वाढीच्या मुद्यावर राजकीय नेत्यांची निष्क्रियता म्हणून मिळणारा कमी दर, सांगा आता बागेवर लावलेल्या पैशाची भरपाई कशी होईल, अन आम्ही कशी दिवाळी साजरी करावी, असा प्रश्‍न शेंदूरजना घाट (अमरावती) येथील देवेंद्र देवघरे संत्रा बागायतदारांचे प्रतिनिधी म्हणून आपली हतबलता व्यक्‍त करीत होते. रंगसंगतीसाठी नागपुरी संत्री ओळखला जात असली तरी, भाव नसल्याने यंदा मात्र आमच्या जीवनाचा बेरंग झाल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

यंदा फळांच्या दरातील घसरणीमुळे पुढील हंगामात रोपांची मागणी कमी होण्याची शक्‍यता जावेद खान हस्ते खान पठाण यांनी व्यक्‍त केली. त्यामुळे रोपवाटिका व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांचा रोजगारही प्रभावित होईल.

Drought Condition
Paddy Crop Damage : पावसाने भात पिकाचे नुकसान

मध्यप्रदेशातील आगर, सुजालपूर, राजगड, शहाजापूर, इंदूर, उज्जैन, निमच, रतलाम, आष्टा, सिहोर, राजस्थानमधील कोटा, झालावाडा, बारा त्यासोबतच महाराष्ट्रातील अमरावती नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, मानवत, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, नगर, जालना अशा तीन राज्यांमध्ये संत्रा, मोसंबी क्षेत्र आहे. यामध्ये १०० आमदार, तर १५ ते २० खासदार असताना यातील एकाही नेत्याने बांगलादेशच्या आयात धोरण शुल्क प्रकरणी प्रश्‍न मांडू नये ही त्यांची निष्क्रियता असल्याचे शेतकरी उद्धव फुटाणे यांनी सांगितले.

विमा भरपाईस टाळाटाळ

संरक्षण होण्याच्या उद्देशाने २०२२-२३ मध्ये बागायतदारांनी हेक्‍टरी १२ हजार रुपयांचा भरणा करून फळपीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. १४ तालुक्‍यांतील ६७ महसूल मंडलांत ३५१५ शेतकऱ्यांनी ३ कोटी ९८ लाख २३ हजार २००० रुपयांचा भरणा करून ३३१८.६ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित केले. त्यानंतरही त्यांना देय असलेली १४ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळाली नाही. ही भरपाई मिळाली असती तरी देखील आमची दिवाळी गोड झाली असती अशी प्रतिक्रिया देवेंद्र देवघरे यांनी व्यक्‍त केली.

Drought Condition
Land Slide : दरडग्रस्‍त गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

दरात झाली घसरण

ऑक्टोबरपासून आंबिया बहाराची फळे उपलब्ध झाली. अडीच महिने निघून गेले आता हंगाम एक महिना १५ दिवस उरला आहे. देशाच्या काही भागात पाऊस, तर उत्तरेत थंडी पडत आहे. परिणामी मागणी घटल्याने प्रती क्रेट दर २०० रुपयांनी घसरले आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

तीन स्ट्रिगरच्या आधारेच भरपाई

वरुड तालुक्‍यात वरुड, शेंदूरजनाघाट, पुसला, बेनोडा, चांदस-वाठोडा, राजुरा बाजार, लोणी अशी सात मंडले आहेत. यातील शेंदूरजनाघाट मंडलाचा अपवाद वगळता उर्वरित मंडळात गेल्यावर्षी चार स्ट्रिगर लावण्यात आले, तर शेघाट मंडळात तीन स्ट्रिगरच्या आधारे भरपाई देण्यात आली. तापमानातील वाढीमुळे झालेल्या नुकसानीसाठीचा स्ट्रिगरच नाही. असा अन्याय करूनही विमा भरपाई दिली गेली नाही, असा आरोप शेतकरी विवेक फुटाने यांनी केला.

शेंदूरजना घाट गावाविषयी (हेक्‍टर)

भौगोलिक क्षेत्र ७२७.४८

वहितीखालील क्षेत्र ५५७.५०

संत्रा मृग बहार १०

संत्रा आंबिया बहार ३४२

लहान १७

एकूण संत्रा लागवड३६९ हेक्‍टर

अशी झाली आयात शुल्कात वाढ (रुपयात)

२०१९ २०

२०२० ३०

२०२१ ५१

२०२२ ६३

२०२३ ८८

पिकाखालील क्षेत्र (हेक्‍टर) वरुड तालुका २७१४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com