Drought Crisis : दुष्काळामुळे सणासुदीसाठी चैतन्य उरलं नाही

Drought Condition in Diwali : दिवाळी झाली की पिण्याचा गंभीर प्रश्न अजूनच गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत आता जगायचं कसं, हा संघर्ष वाढत आहे. या दुष्काळामुळे सणासुदीला चैतन्य उरलं नाही.
Drought Condition
Drought ConditionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : खरीप हंगामात पाऊस झाला; पण तो असून नसल्यासारखा होता. खरिपातील जिरायती पिके हातातून गेली. नंतर झालेल्या पावसामुळे विहिरीत पाणी आले. या थोड्याफार पाण्यावर भाजीपाला केला; मात्र तोही आता करपून चालला आहे. रब्बी हंगामातील पिके आता येणार नाही. तळ गाठण्यापूर्वी जनावरांना घास पेरायचा होता.

त्यासाठी वाफे बांधून ठेवले, मात्र आता विहिरीने तळ गाठल्याने तो पेरता आला नाही. पाणी संकट असल्याने खर्च आणि मेहनत वाया जाण्यापेक्षा आता घास पेरणी थांबविली आहे. दिवाळी झाली की पिण्याचा गंभीर प्रश्न अजूनच गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत आता जगायचं कसं, हा संघर्ष वाढत आहे. या दुष्काळामुळे सणासुदीला चैतन्य उरलं नाही, अशी कातरत्या आवाजात गंभीर स्थिती जिल्ह्यातील हिरापूर(ता.चांदवड) येथील शेतकरी कृष्णा पुंडलिक गोराणे यांनी सांगितली.

हिरापूर हे २,६०० लोकसंख्येचे गाव. मागील वर्षी परिस्थिती बरी होती; मात्र यंदा पाऊस नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. जिरायती पिकांमध्ये मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग पेरणी होती. मात्र पावसामुळे पिकांची वाढच झाली नसल्याने उत्पादन नावापुरते हाती आले आहे. काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा दिसतात; मात्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर त्याही अडचणीत आहेत.

Drought Condition
Agriculture Electricity : रब्बीसाठी पूर्ण वेळ वीज, रोहित्रे तत्काळ द्या

सांगा दिवाळी साजरी करायची तरी कशी?

विहिरीत पाण्याचा पत्ता राहिला नाही. गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू आहे. यंदा पावसाळ्यात सुद्धा पिण्याचा पाण्याचा टँकर चालू होता. दिवाळीचा सण तोंडावर आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी तो असून नसल्यासारखा आहे. हाती जे थोडेफार भांडवल होतं ते खर्च केले. मात्र हातात काहीच आलं नाही मग आता तुम्ही सांगा ही दिवाळी साजरी करायची तरी कशी, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. आज अशी वाईट वेळ आली आहे तर पुढे पहिलासुद्धा पाणी उरणार नाही. विहिरीमध्ये पाणी आता येत नाही. थोडेफार पाणी बोरवेलमधून उपलब्ध होते, मात्र तेही थोडेफार असल्याने आता चिंता लागून राहिली आहे. शासनाने त्यासाठी मदत करावी.

दृष्टिक्षेपात हिरापूर

लोकसंख्या २,६१२ (२०११ जनगणणेनुसार)

एकूण क्षेत्र १,००३ हेक्टर

कृषक क्षेत्र ९५० हेक्टर

पीक क्षेत्र(हेक्टर)

द्राक्ष बागा १००

बाजरी ३०

मका २४८

मूग २०

भूईमूग १५

सोयाबीन ४३८

टोमॅटो २८

कांदा रोपे २५

खरीप कांदा ११०

नवीन निर्माण झालेल्या काही महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे नाहीत. त्या मंडळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून या समितीची बैठक घेऊन उरलेल्या महसूल मंडळांचाही समावेश यादीत करू.
छगन भुजबळ, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री
Drought Condition
Drought Crisis : विहिरी कोरड्या पडल्या, सहा महिने कसे जगायचे?
सरकार जनतेबरोबर पुढच्या टप्प्यात बाकीचे तालुकेही दुष्काळी म्हणून जाहीर होऊन त्यांना मदत मिळेल,यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करेन.
दादा भुसे,पालकमंत्री
इतर तीन मंडळांचाही समावेश होण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांना विनंती केली आहे.मी स्वतः मंत्र्यांच्या बैठकीत तालुक्यातील स्थितीचा वास्तववादी आढावा सादर केला.
सुहास कांदे, आमदार, नांदगाव
चालूवर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे तालुक्यात सर्वत्र दुष्काळ पडला आहे. तरी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुका यादीमध्ये समावेश झाला आहे. आता शासनस्तरावरून कार्यवाही तत्काळ होणे गरजेचे आहे. पीकविमा तातडीने मिळाला पाहिजे. चारा छावणी, पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे.
ज्ञानेश्वर कांगुणे, शेतकरी, हिरापूर, ता.चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com