Drought Condition Maharashtra : दुष्काळग्रस्तांना दिलासा पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती, राज्य सरकारचे आदेश

Kolhapur Drought : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांतील २० मंडलांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.
Drought Condition Maharashtra
Drought Condition Maharashtraagrowon
Published on
Updated on

Maharashtra Drought News : राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने अनेक जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती आहे. दरम्यान महाराष्ट्रातील ४० तालुके आणि १ हजार २१ महसुली मंडलात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यातील आणि महसुली मंडळातील शेतकऱ्यांसाठी खरीप २०२३ हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाची मध्यम मुदत कर्जात व्याजासह फेररचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच खरीप २०२३ मधील पीक कर्जाच्या फेररचनेची कार्यवाही सर्व बँकांनी ३० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असेही सहकार विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हे आदेश दहा नोव्हेंबर २०२३ पासून अमलात येणार असून सरकारने हे आदेश रद्द न केल्यास ते पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहेत. त्या अनुषंगाने, राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सन २०२३ च्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) यांच्यामार्फत राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून, तसेच या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे, अशा एकूण १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

जे शेतकरी मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप २०२३ च्या हंगामातील पीक कर्जाची व्याजासह फेररचना केली जावी असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे

कोल्हापुरातील २० मंडलांना लाभ

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांतील २० मंडलांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक ते दीड लाख खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज, वीजबील, घरफाळा यासह अन्य सवलती मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com