Pune News : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भाच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही शेतीचे नुकसान झाले आहे. येथे छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी सोमवारी (ता.९) एकत्रित पाहणी करणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून सऱ्या आघाडीचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहेत. याबाबतचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच केले आहेत. त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीस लागले आहेत. तर काही छोटे पक्ष एकत्र येत तिसऱ्या आघाडीची चाचपणी करत आहेत. यात छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टींसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह काही नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
यादरम्यान यात छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत. तसेच नेते यावेळी शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेणार आहेत. पण यावरून हा दौरा तिसऱ्या आघाडीची चाचपणीसाठीच असल्याचे बोलले जात आहे.
तर नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या दौरा राजकीय नसून फक्त शेतकऱ्यांसाठी असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे. तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी या दौऱ्यावर भाष्य करताना, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहावे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. तर ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे, त्यांना तर नुकसान भरपाई मिळेलच. पण ज्यांनी भरला नाही त्यांना २०१९ च्या प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. २०१९ मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांचे कर्ज माफ झाले होते. किंवा त्या कर्जाची रक्कम देण्यात आली होती. त्याप्रमाणे आता मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारने द्यावी, असेही शेट्टींनी म्हटले आहे.
दौऱ्यात सहभागी 'हे' ही नेते
नांदेड आणि परभणी दौऱ्यावर स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्ष प्रमुख व आमदार बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॅा. राजरत्न आंबेडकर आणि भारतीय जवान किसान पार्टी अध्यक्ष नारायण अंकुशे सहभागी असतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.