Shivraj Singh Chouhan| देशातील नव्या स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार: शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

AgriSure Fund And Agriculture Investment Portal Launch : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यासह कृषी उद्योगाच्या विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या इन्व्हेस्टमेंट पोर्टल आणि ॲग्रीसुर फंड पोर्टलचा शुभारंभ केला.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशाच्या 'जीडीपीत' (सकल राष्ट्रीय उत्पादनात) कृषीचा वाटा १८ टक्के असून देशातील नव्या स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते नवी दिल्ली येथे 'अॅग्रीशुअर फंड' 'कृषी गुंतवणूक पोर्टल' च्या पोर्टलचा शुभारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी आणि रामनाथ ठाकूर देखील उपस्थित होते.

देशाच्या 'सकल राष्ट्रीय उत्पादनात' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) कृषीचा वाटा १८ टक्के असून देशातील नव्या स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल अशी घोषणा, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान केली आहे. तसेच शेतकरी हाच सर्वात मोठा उत्पादक असून तोच सर्वात मोठा उपभोक्ताही असल्याचेही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते नवी दिल्ली येथे 'अॅग्रीशुअर फंड' 'कृषी गुंतवणूक पोर्टल' च्या पोर्टलचा शुभारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी आणि रामनाथ ठाकूर देखील उपस्थित होते.

Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chouhan : शेतकरी आणि कृषी उद्योगासाठी 'अॅग्रीशुअर फंड' आणि 'अॅग्री इन्व्हेस्टमेंट पोर्टल'; केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान करणार आज शुभारंभ

शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशातील ५० टक्के लोक आजही शेती करत असून कृषी क्षेत्रात नवे स्टार्टअप्स आणि विद्यार्थी येत आहेत. त्यांच्याकडे सगळ आहे. त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी फक्त सरकारने आधार देण्याची गरज आहे. तो आधार देण्यासाठी, स्टार्टअप्सच्या विकासासाठी 'अॅग्रीशुअर फंड'चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातही नवे स्टार्टअप्स, विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

तसेच शेतकरी जेव्हा खरेदी करतात. तेव्हा कारखाने चालतात, नवे उद्योग सुरू होतात. त्यातूनच नवे अर्थकारण जन्माला येते. त्यामुळे शेतकरी हाच सर्वात मोठा उत्पादक असून तोच सर्वात मोठा उपभोक्ता आहे. देशाच्या जीडीपीत शेतकऱ्यांचा वाटा सध्या १८ टक्के दिसत असला तरिही तो अप्रत्यक्षात जास्त असल्याचेही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिकता शेतीला असून पंतप्रधानांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतीमध्ये अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत. पंतप्रधान फक्त घोषणा करत नाहीत. तर शेतकरी आणि शेती कशी पुढे जाईल हे पाहताना देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करत आहेत. याचपार्श्वभूमीवर काहीच दिवसांच्याआधी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या ६५ पिकांच्या १०९ नवीन हवामान अनुकूल बियाणे आणली होती. ज्यात भाताचे वाण असून जे ३० टक्के पाण्यावर घेतले जाऊ शकते. तर बाजरीचे देखील ७० दिवसात येणारी जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसीत केले आहे.

Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chouhan : परळी कृषी महोत्सवातून शिवराज सिंह यांची विरोधकांवर टीका

सरकार पीक उत्पादन वाढवण्यासाठी, हवामानाला अनुकूल बियाणे वापरण्यासाठी आणि जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या धोक्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे. तर शेतकऱ्यांना युरिया, डीएपी आणि खतांवर अनुदान दिले जात आहे. त्यामुळे खताची किंमत आवाक्यात असून खर्चही कमी आटोक्यात आल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले.

तसेच शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असून नवनवीन पद्धती वापरण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांना युरियावर २१०० रुपये अनुदान मिळते. तर डीएपी १३५० रूपयात शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले जात आहे. तर रशिया युक्रेन युद्धामुळे शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून २ हजार ६२५ कोटी रूपयांचे विशेष पॅकेज शेतकऱ्यांना दिल्याचा दावा यावेळी कृषिमंत्र्यांनी केला. यावेळी कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते कर्जाच्या रकमेच्या मंजुरीमध्ये एसबीआयला प्रथम तर एचडीएफसी बँकेला रक्कम मंजूर केल्याबद्दल नोबल मोहिम AIF एक्सलन्स पुरस्कार देण्यात आला. यावेळी अनेक बँका आणि राज्यांनाही पुरस्कार देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com