
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आत्तापर्यंत अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत सुमारे ८२.७ टक्केच पाऊस झाला आहे. दोन कृषी विभागांचा विचार करता दोन्ही विभागांत सुमारे ८ ते २३ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट असल्याची स्थिती आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५८१.७० मिलिमीटर इतके आहे. दुसरीकडे १ जून ते ५ ऑगस्ट दरम्यान सुमारे ३०२.२० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २९१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो आजवरच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ९६.६ टक्के इतका आहे. जालना जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०३.१० मिलिमीटर इतके आहे. त्यापैकी ५ ऑगस्टपर्यंत सरासरी ३२५.२० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ३४७.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जो सरासरी पावसाच्या तुलनेत थोडा पुढे जाऊन म्हणजे १०६.७ टक्के आहे. बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ५६६.१० मिलिमीटर इतके आहे. जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत २७८.४० मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २०३.१ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेतल्या ७३ टक्केच पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ७०६ मिलिमीटर आहे. ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र २१६.२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ६०.९ टक्केच पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१० मिलिमीटर इतके आहे.
५ ऑगस्टपर्यंत सरासरी २८८.९० मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४१.८ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ८३.७ टक्केच पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१४.४० मिलिमीटर आहे. आत्तापर्यंत ४३९.६० मिलिमीटर सरासरी पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३४९.८ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ७९.६ टक्केच पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७६१.३० मिलिमीटर आहे.
त्यापैकी आतापर्यंत सरासरी ४०१.२० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३०८.५ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत ७६.९ टक्केच पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९५.३० मिलिमीटर इतके आहे. त्यापैकी ५ ऑगस्टपर्यंत सरासरी ४३८.३० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३७०.७ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत ८४.६ टक्के पाऊस झाला आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत तूट मोठी
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत आजवर पडलेला पाऊस पाहता तूट मोठी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५०.२ टक्के पाऊस झाला. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ५७.६ टक्के, बीडमध्ये ३५.९ टक्के, लातूरमध्ये ३०.६ टक्के, धाराशिवमध्ये ४०.१ टक्के, नांदेडमध्ये ४३ टक्के, परभणीत ४०.५ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यातील ४६.६ टक्के पाऊस झाला आहे.
वार्षिक सरासरी पावसाचा तुलनेत छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांत मिळून ४७.९ टक्के, तर लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत मिळून सरासरी ४०.२ टक्केच पाऊस झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.