Wadaj Irrigation Scheme : ‘वडज’ सिंचन योजनेसाठी ३५ कोटी ५० लाखांचा निधी

Agriculture Irrigation : मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वडज उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
Takari Upsa Irrigation Scheme
Takari Upsa Irrigation Schemeagrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वडज उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी ३५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेसाठी माजी आमदार स्व. वल्लभशेठ बेनके आग्रही होते. आता या योजनेला निधी मंजूर झाल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल,’’ अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या संदर्भात मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात गुरुवारी (ता.१८) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. आमदार दिलीप मोहिते यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Takari Upsa Irrigation Scheme
Purandar Irrigation Scheme : ‘पुरंदर उपसा’ होणार गतिमान

बेनके म्हणाले, ‘‘पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या निधीसाठी प्रयत्न चालू होते. यातील वडज उपसा सिंचन या महत्वकांक्षी प्रकल्पाला शासनाने मान्यता देऊन ३५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मीना खोऱ्यातील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी वडज उपसा सिंचन ही महत्त्वाची योजना आहे.

Takari Upsa Irrigation Scheme
Godavari Irrigation Scheme : किमान शंभर कोटींचे पॅकेज द्या

या योजनेच्या सर्वेक्षण कामासाठी देखील पाठपुरावा करून निधी मिळविला. या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून या योजनेच्या मंजुरीसाठी काम केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी या पूर्वी चिल्हेवाडी पाइप लाईन योजनेसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. हे काम प्रगतिपथावर आहे.’’

‘‘वडज उपसा सिंचन योजनेतून मीना खोऱ्यातील सावरगाव, वडज, खिलारवाडी, निमदरी, विठ्ठलवाडी, धोंडकरवाडी, काचळवाडी, पाबळवाडी, निळोबाराय नगर यांसह इतर वाड्या-वस्त्यांना सिंचनाचा लाभ होईल. मीना खोरे पाणी संघर्ष समिती आणि शेतकरी, ग्रामस्थांनी याप्रश्‍नी संघर्ष केला. त्यास यश आले,’’ असेही बेनके म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com