Illegal Cattle Transport : अवैध गोवंश वाहतुकीच्या वाहनासह चालक फरारी

Livestock Transport : भुसावळ तालुक्यातील सावतर निंभोरा येथे ग्रामस्थांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले.
Illegal Cattle Tranport
Illegal Cattle Tranport Agrowon

Bhusawal News : भुसावळ तालुक्यातील सावतर निंभोरा येथे ग्रामस्थांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. ग्रामस्थ अवैध गोवंश वाहतुकीची पोलिसांच्या ११२ क्रमांकावर माहिती देत असताना चालक (एमएच १९.सीयू.००९६) वाहन घऊन फरार झाला. ग्रामस्थांनी वरणगाव पोलिसांत निवेदन देऊन वाहनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

येथून जवळच असलेल्या सावतर निंभोरा गावाच्या मुख्य रस्त्याने अवैध गोवंश कोंबून भरलेले वाहन पोलिस पाटील व ग्रामस्थांच्या नजरेस पडले असता त्यांनी वाहनाला थांबवून चौकशी केली असता चालकाने उडवाउडवी उत्तर दिले.

Illegal Cattle Tranport
Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

तर वाहनांत काही गोवंशांतील जनावरे जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदत क्रमांक ११२ वर संपर्क करून माहिती दिली. त्याअनुषंगाने वरणगाव पोलिस स्टेशनच्या अधिकारी गणेश देशमुख यांनी वाहन पोलिस स्टेशनला आणावे अशी सूचना केली. ग्रामस्थ चालकाला वाहन पोलिस ठाण्यात घ्यावे असे सांगत असतानाच चालकाने चलाखी करत‌ वाहन पोलिस ठाण्यात न नेता तेथून वाहनासह पळून गेला.

Illegal Cattle Tranport
Animal Care : जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा वापर करा जरा जपूनचं

याप्रकरणी सावतर निंभोरा येथील पोलिस पाटील अरुण कोळी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस अधिकारी गणेश देशमुख यांना सविस्तर प्रकाराची माहिती देत रोज गावाच्या मुख्य रस्त्यावरून गोवंशाची वाहनात कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती दिली.

अवैध गोवंश पळवून नेणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी सावतर निंभोरा येथील अरुण कोळी, प्रदीप कोळी, रोशन कोळी, कुंदन कोळी, किरण कोळी, ज्ञानेश्वर कोळी, हिरामण कोळी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com