Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

Sugarcane Management : ठिबक सिंचनाद्वारे दिलेल्या अन्नद्रव्यांचा पिकाच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. कार्यक्षम मुळांभोवती खते दिल्याने निचरा किंवा बाष्पीभवनाद्वारे होणारे नुकसान कमी होऊन खत मात्रेत ३० टक्के बचत होते.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

अरुण देशमुख

Sugarcane Farming Method : ठिबक सिंचनाद्वारे दिलेल्या अन्नद्रव्यांचा पिकाच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. कार्यक्षम मुळांभोवती खते दिल्याने निचरा किंवा बाष्पीभवनाद्वारे होणारे नुकसान कमी होऊन खत मात्रेत ३० टक्के बचत होते.

ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्यांचे योग्य व आवश्यक प्रमाण असणारी पाण्यात विरघळणारी किंवा द्रवरूप खते पिकांच्या मुळांशी योग्य त्या प्रमाणात परिणामकारकरीत्या देता येतात. जमिनीतील ओलित क्षेत्र आणि कार्यक्षम मुळांजवळ अन्नद्रव्ये दिल्याने त्यांची उपलब्धता वाढते.

एक टन ऊस तयार करण्यासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषले जाते. म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १५० किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे जरुरीचे आहे.

खतांची निवड आणि कार्यक्षम वापर

खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक त्या अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.

जमिनीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर आणि पूर्णपणे विरघळणारी असावीत.

खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.

खतातील क्षारांमुळे गाळण यंत्रणा व ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नये तसेच संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये किंवा अनिष्ट परिणाम होऊ नये.

खते शेतातील वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.

खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये.

एका वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्रित देताना त्यांची आपापसांत कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.

Sugarcane Farming
Sugarcane Water Management : आडसाली उसाला द्या या महत्वाच्या अवस्थेत पाणी

नत्राचे कार्य

कमतरता भासल्यास हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन ऊस पिवळा पडतो, पाने आकाराने कमी राहतात, कांड्या आखूड, कमी जाडीच्या होतात. मुळे लांब परंतु बारीक राहतात. पर्यायाने उत्पादनावर परिणाम होतो.

सर्व प्रकारची प्रथिने तसेच हरीतद्रव्याचा अविभाज्य घटक आहे.

पाने, खोड आणि फांद्यांची वाढ जोमाने होते, परंतु मुळांची वाढ खुंटते.

वनस्पतीच्या शरीरात प्रथिनांचे प्रमाण वाढवितो.

वाढ्याची नाजूकता व रसरशीतपणा वाढून दर्जा उंचावतो.

पालाश, स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात शोषण होते.

पालाशचे कार्य

एक टन ऊस तयार करण्यासाठी साधारणपणे ३ ते ४ किलो पालाश जमिनीतून घेतला जातो.

उसाचा जोमदारपणा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.

पेशीमध्ये पाण्याचे नियंत्रण होते. तसेच जडणकार्य, श्‍वासोच्छ्‌वास आणि जलछेदन या क्रियेमध्ये समतोलपणा आणून पाण्याची बचत करतो. यामुळे पिके पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतात.

साखरेसारख्या पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे रूपांतर होण्यास तसेच त्यांचे स्थलांतर घडवून आणण्यास मदत. साखरेचे प्रमाण वाढते.

Sugarcane Farming
Sugarcane Water Management : आडसाली उसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

स्फुरदाचे कार्य

नत्राच्या तुलनेने स्फुरदाची आवश्यकता कमी प्रमाणात लागते.

सुरुवातीच्या अवस्थेत स्फुरदाचा भरपूर पुरवठा झाल्यास फुटवे लवकर व भरपूर फुटतात.

मुळांची लवकर व भरपूर वाढ होते. पीक जोमाने वाढण्यास मदत होते.

जलद व जोमदार वाढ होऊन टणकपणा येतो.

जास्त नत्रामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामास प्रतिबंध होतो.

पीक लवकर पक्व होते, बीज धारणा, वाढ जलद गतीने होण्यास मदत होते. दर्जा सुधारतो.

वातावरणातील नत्र जास्त प्रमाणात शोषून घेण्यास मदत होते.

बेसल खतमात्रा

मुळांची चांगली वाढ होऊन भरपूर फुटव्यासाठी शेत नांगरणीच्या वेळेस दर एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. बेसल खतमात्रा म्हणून एकरी गंधक २४ किलो, फेरस सल्फेट १० किलो, झिंक सल्फेट ८ किलो, मॅंगेनीज सल्फेट १० किलो, निंबोळी ८० किलो, बोरॉन २ किलो द्यावे.

ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती

ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध, मात्राबद्ध पद्धतीने खते देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खतांची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकसारखी राहते. खत मात्रा, पाण्याचा प्रवाह सतत सारखा राहतो. उदा. १ लिटर खत द्रावण आणि १०० लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरुपात म्हणजेच पीपीएममध्ये मोजली जाते.

मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खतमिश्रित आणि खतविरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खत मात्रा किलोग्रॅम / हेक्टर या स्वरूपात मोजली जाते.

ठिबक सिंचनातून खते देण्यासाठी व्हेंचुरीचा वापर करावा.

ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन मार्गदर्शक तक्ता लागणीपूर्वी

शेणखत गंधक फेरस सल्फेट झिंक सल्फेट मँगेनीज सल्फेट निंबोळी बोरॉन

१० टन २४ किलो १० किलो ८ किलो १० किलो ८० किलो २ किलो लागणीनंतर

लागणीनंतर

खते देण्याची वेळ नत्र स्फुरद पालाश % मात्रा युरिया

(किलो /एकर ) % मात्रा फोस्फेरिक आम्ल किंवा १२:६१:० (किलो /एकर ) % मात्रा म्युरेट ऑफ पोटॅश

(किलो /एकर)

लागणीनंतर ४५ दिवसांपर्यंत ९ ३१.२३ १०.०८ ७ ७.९८

४६ ते १३५ दिवसांपर्यंत ४० १३८.८० ४० ४४.८० २० २२.८०

१३६ ते १८० दिवसांपर्यंत २० ६९.४० २० २२.४० २५ २८.५०

१८१ ते २२५ दिवसांपर्यंत १५ ५२.०५ १५ १६.८० २० २२.८०

२२६ ते २७० दिवसांपर्यंत १० ३४.७० १० ११.२० १५ १७.१०

२७० ते ३०० दिवसांपर्यंत ६ २०.८२ ६ ६.७२ १३ १४.८२

एकूण १०० ३४७ १०० ११२ १०० ११४

टीप: १) वरील शिफारस ही सर्वसाधारण असून, माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी.

२) को ८६०३२ जातीसाठी खत मात्रा २५ टक्यांनी वाढवून द्यावी.

३) वरील खतमात्रा दर दिवशी एक दिवसाआड द्यावी.

रासायनिक अन्नद्रव्यांची शिफारस

विभाग हंगाम रासयनिक खतांचे शिफारशीत मात्रा (किलो, हे.)

नत्र स्फुरद पालाश

पश्‍चिम महाराराष्ट्र आडसाली ४०० १७० १७०

मराठवाडा आडसाली ४०० १७० १७०

विदर्भ आडसाली ४०० १७० १७०

टीप: १) वरील खतांची शिफारस ही सर्वसाधारण असून, माती परीक्षणानुसार खत मात्रा द्यावी.

२) को ८६०३२ या ऊस जातीसाठी वरील शिफारशीत खतांपेक्षा २५ टक्के मात्रा वाढवून द्यावी.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com