Team Agrowon
आडसाली हंगामातील ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन करताना उसाच्या शरीरक्रियाशास्त्रातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे.
अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते, तर सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण उत्पादन वाढविते.
जमीन वाफशावर राहील एवढेच पाणी दिल्यास, लवकर व भरपूर फुटवे फुटतात. त्यामुळे शेतात एकसारखे ऊस तयार होतात. अपेक्षित उसाची संख्या मिळणे शक्य होते.
अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसल्यास फुटवे कमी निघतात, आलेले फुटवे मरतात. ऊस संख्या कमी मिळाल्यामुळे उत्पादन कमी येते.
जास्त पाणी दिल्याने मुळांशी हवा राहत नाही, फुटवे फुटण्यावर अनिष्ट परिणाम होतो. फुटव्यांच्या वाढीवर परिणाम होतो.
उत्पादनवाढीच्या अवस्थेमध्ये योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करावा. या अवस्थेमध्ये उंची, कांड्यांची लांबी, जाडी वाढत असते. याचा प्रत्यक्ष परिणाम वजन वाढण्यावर होतो.
जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये कांड्यामध्ये साखर साठविण्याचे कार्य सुरू असते. या कालावधीमध्ये उसाची पाण्याची गरज ही सर्वोच्च असते.
जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण जर ८५ टक्के दरम्यान असेल तर कांड्याची लांबी, जाडी वाढून वजन झपाट्याने वाढते.
पाण्याचा ताण पडल्यास कांड्या एकदम आखूड होतात, उंची खुंटते. पाण्याचा ताण जोमदार वाढीच्या शेवटच्या टप्प्यात पडल्यास पक्वता लवकर येते आणि उत्पादन घटते.