
अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani News : परभणी ः कोरडवाहू शेतीमध्ये रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली आहे. कोरडवाहू शेतीत शास्त्रीय पद्धतीने पाणी वापर करावा लागेल. लहान शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीसह पशुपालनाची जोड दिल्यास जोखीम कमी होईल. हवामान बदलांमुळे कोरडवाहू शेतीमध्ये अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यादृष्टीने आवश्यक संशोधनाची चौकट बदलावी लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (नैसर्गिक साधन संपत्ती) डॉ. सुरेश कुमार चौधरी यांनी केले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांची १९ व्या आणि हवामान बदलानारुप राष्ट्रीय कृषी उपक्रमाची १२ व्या राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमात सोमवारी (ता. ६) डॉ. चौधरी बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था यांच्यातर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी होते. हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे (क्रीडा) संचालक डॉ. व्ही. के. सिंग, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे समन्वयक जे. व्ही. एन. एस. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे आदी मंचावर उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, की महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारणामुळे कोरडवाहू शेतीला संजीवनी मिळाली. जलसंवर्धनाच्या कामाची फळे शेतकरी चाखत आहेत. ‘पोकरा’मुळे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा प्रसार झाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की कोरडवाहू शेतीमध्ये जोखीम व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी यांत्रिकीकरणातून वेळेवर कामे शक्य आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरणासाठी शास्त्रज्ञांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
डॉ. व्ही. के. सिंग म्हणाले, की कोरडवाहू शेतीत जलव्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शेततळ्यांतील पाणी वापरामुळे उत्पादकता वाढली आहे. डॉ. जे. व्ही. एस प्रसाद म्हणाले, की रुंद वरंबा सरी, विहीर, बोअर फेरभरण, शेततळे या तंत्रज्ञानाचा प्रसारात परभणी कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे योगदान महत्त्वाच आहे. डॉ. सुनीलकुमार म्हणाले, कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेतकरी समुदायाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.