Akola-Washim Bank
Akola-Washim Bank Agrowon

Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार प्रदान

Akola-Washim DCC Bank : तीन पिढ्यांपासून कोरपे परिवाराने जिल्ह्यासह राज्यातील सहकार चळवळ अधिक गतिमान केली असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागाचा आमूलाग्र विकास घडविण्यात मोठा वाटा राहिला आहे.
Published on

Akola News : स्थानिक अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२३-२०२४ चा (कै.) वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय (कै.) विष्णूअण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हे दोन्ही पुरस्कार डॉ. संतोषकुमार कोरपे यांना बुधवारी (ता. २३) मुंबई येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए. भाऊ भगवंत कड व कोकण विभागाचे महसुल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तीन पिढ्यांपासून कोरपे परिवाराने जिल्ह्यासह राज्यातील सहकार चळवळ अधिक गतिमान केली असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागाचा आमूलाग्र विकास घडविण्यात मोठा वाटा राहिला आहे. याची दखल घेत डॉ. कोरपे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. कोरपे यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

Akola-Washim Bank
NABARD Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला ‘नाबार्ड’चा ‘उत्कृष्ट जिल्हा बँक’ पुरस्कार

ही किमया अध्यक्ष डॉ. कोरपे यांनी सहजपणे करून दाखविल्यामुळे त्यांना एक नव्हे, दोन नव्हे तर तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नुकतेच ‘नाबार्ड’नेसुद्धा त्याची दखल घेऊन उत्कृष्ट बँक म्हणून अकोला-वाशीम जिल्हा बँकेला सन्मानित केले आहे.

Akola-Washim Bank
NABARD Award : अहिल्यानगर जिल्हा बँकेला ‘नाबार्ड’चा पुरस्कार

तरुण आणि महिलांनी पुढे यावे ः कोरपे

सहकाराला अधिक बळकटी आणण्याकरिता तरुणांनी तसेच महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. तरुणांतून उद्योजक निर्माण झाले पाहिजे. महिलांनी देखील बँकेच्या आर्थिक मदतीने लघू उद्योग, कुटीरोद्योग, उभारावे, असे आवाहन पुरस्काराला उत्तर देताना डॉ. संतोषकुमार कोरपे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com