
Akola News : अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकार क्षेत्रातील एक प्रतिष्ठित संस्था ठरलेली असून यंदा बँकेने यशस्वीपणे ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. ही बँक केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते.
या बँकेच्या कार्याची दखल घेत बँकेला (कै.) वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार तर अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांना सहकार चळवळीतील (कै.) विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे बुधवारी (ता. २३) मुंबईत वितरण केले जाणार आहे.
आर्थिक शिस्त, काळाच्या मागणीनुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि बँकिंग क्षेत्रातील सर्व निकषांचे काटेकोर पालन, यामुळे ही बँक केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ओळखली जाते.
या बँकेने गेल्या शतकभराहून अधिक काळात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक व सर्वसामान्य खातेदारांसाठी आधारस्तंभाचे कार्य केले आहे. बँकेच्या या यशात ग्राहक, खातेदार, हितचिंतकांचा मोलाचा वाटा आहे. या योगदानाचे फलित म्हणून बँकेच्या शिरपेचात या पुरस्कारांनी आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
राज्यस्तरीय पुरस्काराचा सन्मान
दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स् असोसिएशन मुंबईच्या वतीने बँकेला (कै.) वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार जाहीर
करण्यात आला आहे. ही निवड राज्यातील कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि शेतकरीहितासाठी कार्य करणाऱ्या बँकांच्या मूल्यमापनावर आधारित करण्यात आली आहे.
अध्यक्षांना जीवन गौरव पुरस्कार
बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांचे सहकार चळवळीतील योगदानही उल्लेखनीय आहे. सन १९९३ पासून ते बँकेचे नेतृत्व करीत असून त्यांनी केवळ बँकेच्या आर्थिक स्थितीतच सुधारणा केली नाही, तर सामाजिक कार्य, पारदर्शक कारभार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीही उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची दखल घेत (कै.) विष्णूअण्णा पाटील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहे.
बुधवारी पुरस्कार वितरण
या दोन्ही पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता. २३) मुंबईत होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स् असोसिएशन, मुंबईच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले आहे. राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवर, बँकांचे पदाधिकारी आणि विविध संस्था प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.