Fruit Processing Industry : शेतकऱ्यांनी फळप्रक्रिया उद्योग सुरू करावेत ः डॉ. गोखले

Agriculture Processing : पेरू व करवंद या पिकांची फक्त लागवड करावी. त्यासोबतच मूल्यवर्धनासाठी या फळपिकांची प्रक्रिया करून विक्री करावी.
Food Processing
Food Processing Agrowon
Published on
Updated on

Hingoli News : पेरू व करवंद या पिकांची फक्त लागवड करावी. त्यासोबतच मूल्यवर्धनासाठी या फळपिकांची प्रक्रिया करून विक्री करावी. विद्यापीठामार्फत करवंदावरील प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना कुठलीही समस्या आल्यास अथवा प्रक्रियेविषयी प्रशिक्षण हवे असल्यास त्यांनी विद्यापीठाशी संपर्क करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी केले.

Food Processing
Food Processing : ‘राजमाता’ नावाने ‘एक जिल्हा एक ब्रँड’ तयार करा

संपूर्ण मराठवाडा विभागात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्‍या संकल्‍पनेतून विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम अंतर्गत बुधवारी (ता. १० ) कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने विद्यापीठ शास्त्रज्ञांनी सातेफळ येथे रंगनाथ स्वामी व खंदारबन (ता. वसमत) येथे सदाशिव पाटील यांच्या शेतावर भेटी देऊन उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Food Processing
Soybean Processed Food : सोयाबीन प्रक्रिया पदार्थाचा प्रचार, प्रसार करावा

या वेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. जी. डी. गडदे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, उद्यानतज्ज्ञ डॉ. बी. एम. कलालबंडी, कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे उपस्थिती होती.

डॉ. गडदे म्‍हणाले, की ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विद्यापीठाची सर्व महाविद्यालये, संशोधन केंद्रे व प्रत्येक कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन राबविण्यात येतो. डॉ. खंदारे यांनी करवंदावर तसेच इतर फळांवर करावयाच्या प्रक्रियेविषयी आणि डॉ. कलालबंडी यांनी करवंद लागवड याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com