Farmer Advice: शेतकऱ्यांनो जमीन विकू नका, उद्योगांत भागीदारी मागा; राज ठाकरे

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.२) शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलताना शेतकऱ्यांनी थेट जमीन विकू नये, तर उद्योगधंद्यांना जमीन देताना भागीदारीचा आग्रह धरण्याचे आवाहन केले.
Raj Thackeray
Raj ThackerayAgrowon
Published on
Updated on

Pune News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.२) शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलताना शेतकऱ्यांनी थेट जमीन विकू नये, तर उद्योगधंद्यांना जमीन देताना भागीदारीचा आग्रह धरण्याचे आवाहन केले. त्यांनी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतजमीन खरेदीवर निर्बंध आणणारा कायदा करण्याची मागणी केली. सोबतच रायगडमधील शेतजमिनींच्या हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी स्थानिकांना उद्योगांत रोजगार देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे, खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर दिसले. 

राज ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी आपली जमीन कोणत्याही कंपनीला विकू नये. त्याऐवजी कंपन्यांना जमीन देताना शेतकऱ्यांनी त्या कंपनीत भागीदारी मागावी. स्थानिकांना त्या उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. जर आपण आपली जमीन विकली, तर आपण कायमचे संपून जाऊ. शेतकरी आणि त्यांचे हक्क टिकवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने विशेष काळजी घ्यावी.”

Raj Thackeray
Agriculture Advice : संत्रा उत्पादनात सेंद्रिय कर्ब आणि घटकांचा वापर महत्त्वाचा; पाटील यांचे मत

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात कायदा हवा

राज ठाकरे यांनी गुजरातमधील शेतजमीन खरेदीच्या नियमांचा दाखला देत महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “गुजरातमध्ये बाहेरील राज्यातील व्यक्तींना शेतजमीन खरेदी करता येत नाही. तिथे शेतजमीन विकत घ्यायची असेल, तर रिझर्व्ह बँकेकडून ‘फेमा’ कायद्यांतर्गत विशेष परवानगी घ्यावी लागते. ज्या राज्यातून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री येतात, त्या राज्यात असा कायदा आहे.

Raj Thackeray
Agriculture Advice : शेतकरी गटाचा स्वतःचा ब्रँड असावा : रूपनवर

मग आपण महाराष्ट्रात आपल्या जमिनी आणि हक्कांचा विचार का करू नये?” त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, यापुढे उद्योगधंद्यांसाठी जमीन मागणाऱ्या कंपन्यांना थेट जमीन विकण्याऐवजी भागीदारीचा प्रस्ताव ठेवावा. “तुमच्या कंपनीत आम्ही शेतकरी भागीदार म्हणून येऊ, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, पण आम्ही आमची जमीन फुकट देणार नाही,” असे ते म्हणाले.

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांसाठी गेल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. ते म्हणाले, “रायगडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, आणि या व्यवहारात आपलेच लोक सामील आहेत. उद्योगधंदे येत आहेत, पण त्यात बाहेरील राज्यांतील कामगारांना नोकऱ्या मिळत आहेत. मराठी कामगारांना मात्र स्थान मिळत नाही.

एकीकडे शेतकरी बर्बाद होत आहे, आणि दुसरीकडे उद्योग येत असले तरी स्थानिकांना त्याचा फायदा होत नाही. मग शेतकरी कामगार पक्षाचा काय उपयोग? या जिल्ह्याची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.हा मेळावा शेतकरी कामगार पक्षाच्या 78 वर्षांच्या प्रवासाचा उत्सव तर होताच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी लढण्याचा संकल्पही यानिमित्ताने व्यक्त झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com