Pratap Pawar : विद्यार्थी साहाय्यक समितीला पाच कोटींची देणगी

Sakal Media Group : ‘सकाळ माध्यम समूह’ आणि विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी समितीला पाच कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे.
Pratap Pawar
Pratap PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘सकाळ माध्यम समूह’ आणि विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी समितीला पाच कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे. देणगीचा धनादेश व त्यासोबत विश्‍वस्त मंडळाला पत्रही लिहिले आहे. ‘‘आपण सर्वजण, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रगतीचा एक एक टप्पा समिती पुढे जात आहे.

Pratap Pawar
Food Donation : गावांनी उचलली शेतकऱ्यांच्या अन्नदानाची जबाबदारी

देणगीदार आणि हितचिंतकांच्या मनात समितीबद्दलचा विश्वास दृढ आहे. गेल्या दोन वर्षांपासूनचा समितीचा उद्योजकता उपक्रम, पहिल्यांदाच पुण्याबाहेर सुरू होत असलेली वसतिगृहे, सेक्शन ८ कंपनी स्थापनेचा विचार अशा सर्वच प्रयत्नांतून समितीच्या कामाचा परीघ विस्तारतो आहे. याचा आनंद होत असतानाच माझे वैयक्तिक योगदान म्हणून ही देणगी समितीला देऊ इच्छितो,’’ असे प्रतापराव पवार यांनी यांनी पत्रात म्हटले आहे.

Pratap Pawar
Pratap Pawar : कौरव...पांडव आणि सदसद्‌विवेक...!

‘‘ही देणगी कॉर्पस फंडात ठेवून, मिळणाऱ्या व्याजातील १५ टक्के रक्कम संस्थेने व्यवस्थापकीय खर्चासाठी वापरावी. ८५ टक्के रक्कम समितीच्या उद्दिष्टांसाठी प्राधान्याने खर्च करावी, त्यातून पैसे शिल्लक राहिल्यास समाजात अनेक गरजू लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती- संस्था आहेत. त्यांना योग्य ती मदत करावी. यामुळे समितीचे काम मर्यादित न राहता व्यापक व्हावे आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी असा हेतू आहे,’’ असेही मत त्यांनी नोंदविले आहे.

‘‘आपण समाजाचे काही देणे लागतो, हा माझ्या आई - वडिलांकडून मिळालेला संस्कार मी आजवर आचरणात आणला आहे, त्याचाच हा एक भाग असल्याचे मी मानतो,’’ असेही त्यांनी नमूद केले आहे. समितीच्या विश्वस्त सदस्यांनी कृतज्ञतापूर्वक या देणगीचा स्वीकार करून प्रतापरावांबद्दल आदर अजून दुणावत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com