Food Donation : गावांनी उचलली शेतकऱ्यांच्या अन्नदानाची जबाबदारी

Tukaram Beej : जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त कान्नापूर (ता. धारूर) येथे २१ गावांच्या सहकार्यातून शेतकरी कीर्तन महोत्सव गुरुवारपासून (ता. २१) सुरू झाला आहे.
Food Donation
Food DonationAgrowon
Published on
Updated on

Beed News : जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त कान्नापूर (ता. धारूर) येथे २१ गावांच्या सहकार्यातून शेतकरी कीर्तन महोत्सव गुरुवारपासून (ता. २१) सुरू झाला आहे.

या महोत्सवात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दर दिवशीच्या नाश्ता व दोन वेळच्या भोजनरूपी अन्नदानाची जबाबदारी विविध गावांतील ग्रामस्थांनी घेतली आहे.

Food Donation
Organ Donation: अवयवदान सर्वश्रेष्ठ दान

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या अन्नदानाची जबाबदारी म्हातारगाव व सायंकाळच्या अन्नदानाची जबाबदारी सरफराजपूर येथील ग्रामस्थांनी घेतली. जवळपास ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला.

Food Donation
Kidney Donation : सुनेसाठी सासूने लावले आयुष्यच पणाला

शुक्रवारच्या (ता. २२) सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था निमला येथील ग्रामस्थांनी तर दुपारच्या भोजनाची व्यवस्था कोयाळ व सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था आमला येथील ग्रामस्थांनी पार पाडली.

आज (ता. २३) बडखेल गडदेवाडी व वाघाळा, उद्या (ता. २४) मुंगी, कावळेचीवाडी व बोधेगाव, सोमवारी (ता. २५) नागपिंपरी, कचरेवाडी, देवठाणा, मंगळवारी (ता. २६) पुरचुंडी, भिलेगाव व मोहा, तर समारोपाच्या दिवशी बुधवारी (ता. २७) मांडखेल येथील ग्रामस्थ जेवण पुरवतील, असे अॅड. अजय बुरांडे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com