Jalsamrudhha Nashik Abhiyan : ‘जलसमृद्ध नाशिक’साठी ‘ऑन द स्पॉट’ ४२ लाखांची देणगी

Jalsamruddha Nashik Donation : धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतलेल्या ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियानास गंगापूर धरणापासून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
Jalsamrudhha Nashik Abhiyan
Jalsamrudhha Nashik AbhiyanAgrowon

Nashik News : धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांनी हाती घेतलेल्या ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियानास मंगळवारी (ता. १६) गंगावऱ्हे (ता. नाशिक)येथील गंगापूर धरणापासून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या वेळी उपस्थित उद्योजकांनी एक ते अकरा लाखांपर्यंत ४२ लाखांची ‘ऑन द स्पॉट’ देणगी देऊन अभियानास सहकार्य केले.

Jalsamrudhha Nashik Abhiyan
Jalsamruddha Nashik : ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान सोमवारपासून

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, सहायक उपजिल्हाधिकारी जतिन रहेमान, मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, गंगावऱ्हे, सावरगाव, बेळगावढगा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Jalsamrudhha Nashik Abhiyan
Water Scarcity : चाळीसगाव तालुक्यात पाणीटंंचाई तीव्र

फक्त नाशिकच नव्हे, जिल्ह्याबाहेरील धरणांमध्ये गाळ काढण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्‍वासन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिले. ‘ईएसडीएस’चे संचालक पीयूष सोमाणी, विनझिप टेक्नॉलॉजीचे मकरंद सावरकर,

आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके, नाशिक मानव सेवा संघटनेचे राजा जॉली यांनीही मनोगत व्यक्त केले. शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांसह स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे ‘समृद्ध नाशिक फाउंडेशन’ची स्थापना केली. या माध्यमातून गंगापूर धरणातून गाळ काढण्यात येणार आहे. नंदकुमार साखला यांनी प्रास्ताविक केले. रमेश वैश्‍य यांनी आभार मानले.

‘सकाळ’चे विशेष कौतुक

जिल्हा प्रशासन व समृद्ध नाशिक फाउंडेशन यांनी गाळ काढण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘सकाळ फाउंडेशन’ने यापूर्वीही धरणांमधील गाळ काढला. या वर्षीही त्यांनी तीन धरणांची परवानगी आपल्याकडून घेतल्याची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिली. तसेच, गंगावऱ्हेचे सरपंच लक्ष्मण बेंडकुळे यांनी ‘सकाळ’ने गेल्या वर्षी धरणातील गाळ काढल्याने अजूनही पाणीसाठा टिकून असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com