Jalsamruddha Nashik : ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान सोमवारपासून

'Jalsamruddha Nashik' initiative : शहरातील प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांसह विविध सामाजिक संघटनांनी गंगापूर धरणातून गाळ काढण्यासाठी ‘जलसमृद्ध नाशिक’ उपक्रम हाती घेतला आहे.
Jalsamruddha Nashik
Jalsamruddha NashikAgrowon

Nashik News : शहरातील प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांसह विविध सामाजिक संघटनांनी गंगापूर धरणातून गाळ काढण्यासाठी ‘जलसमृद्ध नाशिक’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दिवसाला पाच हजार क्युबिक मीटर गाळ काढून धरणाची क्षमता शंभर कोटी लिटरने वाढविण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमामुळे दोन महिन्यांत धरणाच्या साठवण क्षमतेत साधारणतः ३५ दशलक्ष घनफूट वाढ होईल.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये गुरुवारी (ता. ११) ‘जलसमृद्ध नाशिक’ची बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गिते, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व्यासपीठावर उपस्थित होते.

Jalsamruddha Nashik
Water Bill : शासकीय पाणीपट्टी विरोधात कोल्हापुरात १३ मे रोजी महामेळावा

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की लोकसहभाग व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे. जिल्ह्यातील इतर धरणे, नदी व जलाशयातून गाळ काढण्यात येणार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होईल. यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पादनक्षमता वाढणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Jalsamruddha Nashik
Crop Damage Compensation : पंचनामे करून आर्थिक मदत द्या

फक्त गंगापूरच नव्हे, तर जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांसह पाझर तलावांतूनही गाळ काढण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. या संपूर्ण अभियानात महापालिकेचा सक्रिय सहभाग राहील, असे आश्वासन आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिले. ‘नरडेको’चे अध्यक्ष सुनील गवांदे यांनी स्वागत केले. भारतीय जनसंघ संघटनेचे नंदकुमार साखला यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी उद्योजक जयेश ठक्कर, विजय हाके, मिलिंद वैद्य, कृणाल पाटील, धनंजय बेळे, प्रशांत परदेशी, ऋषीकेश पाटील, मनोज साठे, रमेश वैश्य, अंबरीश मोरे, संजय तांबुळवाडीकर, अक्षय सोनजे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद सजगुरे यांनीही आपले विचार मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com