Dnyaneshwari Parayan: पंचाहत्तर वर्षांत सातशे वेळा ‘ज्ञानेश्‍वरी पारायण’

Vishnupant Sanap: अध्यात्म व शेती यांचा मिलाफ साकारणाऱ्या विष्णुपंत सानप यांनी वयाच्या सातव्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आणि आज ८१व्या वर्षी ७०० वेळा पारायण पूर्ण केले आहे. त्यांच्या नित्य पारायणासोबत शेतीतील सेंद्रिय प्रयोग आणि वृक्षप्रेमाचा आदर्श प्रेरणादायी आहे.
Vishnupant Sanap
Vishnupant SanapAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्‍वरी वाचायला सुरुवात केली. आज वयाची ८१ वर्षे पूर्ण झाली असून, ते दररोज न चुकता सकाळी ज्ञानेश्‍वरीतील तीनशे ओळी नियमित वाचतात.

७५ वर्षांत त्यांनी ७०० वेळा ‘ज्ञानेश्‍वरी’चे पारायण पूर्ण केले आहे. त्यामुळे संपूर्ण ज्ञानेश्‍वरी मुखोद्‍गत झाली आहे. यामुळेच जामखेड तालुक्यातील तरडगावचे प्रगतिशील शेतकरी विष्णुपंत सानप यांचे अवघ्या तालुक्याला कुतूहल वाटते.

Vishnupant Sanap
Ashadhi Wari 2025 : झेडपीने आणले वारकऱ्यांसाठी फूट मसाजर

श्री. सानप यांनी चाळीस वर्षे शिक्षकांची नोकरी केली. कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे वयाच्या सातव्या वर्षी ज्ञानेश्‍वरी वाचण्याची आवड आणि दहाव्या वर्षांपासून शेतीची ओढ लागलेली. नोकरी करतानाही त्यांनी शेतीवरचे प्रेम तसूभरही कमी होऊ दिलेले नाही.

दररोज ३०० ओळी वाचून एक महिन्यात ९ हजार ओव्या वाचन पूर्ण करत पारायण पूर्ण करतात. कुटुंबातील दु:खद प्रसंग वगळले, तर ज्ञानेश्‍वरी पारायणात त्यांनी कधीही ‘खंड’ पडू दिला नाही. आतापर्यंत त्यांनी ७०० हून अधिक वेळा ‘ज्ञानेश्‍वरी पारायण’ पूर्ण केले आहेत.

Vishnupant Sanap
Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

याबाबत श्री. सानप म्हणाले, की ज्ञानेश्‍वरीचे पारायण करताना तुम्ही संपूर्ण ग्रंथ वाचू शकता किंवा विशिष्ट अध्याय निवडू शकता. ज्ञानेश्‍वरी पारायणामुळे जीवन सार्थकी लागल्याचे समाधान वाटते.

त्यांनी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीसाठी वाहून घेतले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! समजून झाडे लावा, झाडे जगवा, झाडांवर व मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, हा उपदेश करत शेतीत वेगळे प्रयोग सुरू केले. आंबा, लिंबू, संत्रा लागवड करत गेल्या २२ वर्षांपासून २० एकरांपेक्षा अधिक क्षेत्र ते सांभाळतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com