Ashadhi Wari 2025 : झेडपीने आणले वारकऱ्यांसाठी फूट मसाजर

Warkari Foot Massage : पंढरपुरातील आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यात पायी येणाऱ्या वारकऱ्यांचा जिल्हा परिषदेचे कर्मचारी मसाज करणार आहेत.
Solapur ZP
Solapur ZPAgrowon
Published on
Updated on

Solapur News : पंढरपुरातील आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यात पायी येणाऱ्या वारकऱ्यांचा जिल्हा परिषदेचे कर्मचारी मसाज करणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी फूट मसाजरद्वारे त्यांच्या पायाला मसाज करण्यासाठी त्यांनी १५० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्याकरिता कर्मचाऱ्यांना फूट मसाजर वितरित करण्यात आले.

Solapur ZP
Ashadhi Wari 2025 : आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना निर्मल दिंडी पुरस्कार

देहू व आळंदीहून निघालेले पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आले आहेत. या पालखी सोहळ्यासोबत पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पालखी मुक्कामी आल्यानंतर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची जिल्हा परिषद प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

Solapur ZP
Ashadhi Wari : आषाढी सोहळ्यासाठी यंदा हटके तयारी

पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेची टीम कामाला लागली आहे. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांसह इतर बाबींकडेही पूर्ण लक्ष देण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला वारकऱ्यांसाठी सुविधा केंद्र, हिरकणी कक्ष स्थापन केले आहेत.

कर्मचाऱ्यांना नोंदी करण्याच्या सूचना

प्रशासन व ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मदतीने पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी फूट मसाजर यंत्रासह टीम तैनात केले आहेत. या टीमचा स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी शनिवारी (ता. २८) भेटी देऊन आढावा घेतला. तेथील नोंदवहीतील नोंदी व वारकऱ्यांची सेवा सुरू असताना ऑनलाइन फोटो ग्रुपवर अपलोड करण्याच्या सूचनाही सीईओ जंगम यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com