District Development : धाराशिव जिल्ह्यात शेती, पाणी क्षेत्राला प्राधान्य देणार

Tourism Business : पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्थांनी मूल्यसाखळी विकसित करावी
Dharashiv Tourism
Dharashiv Tourism Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यात पर्यटन, शेती आणि पाणी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक योजना राबवण्यात येतील, अशी माहिती नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी बुधवारी (ता. पाच) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध यंत्रणांच्या सहविचार सभेत दिली.

पुण्याच्या प्रायमूव्ह संस्थेचे अजित फडणीस, जितेंद्र नाईक, सचिन रुपेकर, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे व शेषराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Dharashiv Tourism
Agri Tourism: कृषी पर्यटन : सर्वांगीण विकासाचे मॉडेल

जिल्ह्यातील सातवाहन काळातील मंदिरे, ऐतिहासिक गड-किल्ले व तुळजापूरसारखी तीर्थस्थळांना एकत्रित करून टूरिस्ट सर्किट तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगून पुजार यांनी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक पर्यटन स्थळांना भेट देता यावी यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्थांनी मूल्यसाखळी विकसित करावी, असे आवाहन करून सूक्ष्म सिंचन असलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाईल व त्यांच्या उत्पादनांची विक्री महामार्गालगत करण्यासाठी नियोजन करण्यात असेही पुजार यांनी सांगितले. जलसंधारण यावर भर देण्यात येणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

Dharashiv Tourism
Eco-Tourism : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये ‘इको टुरिझम’ला प्रतिसाद

जिल्ह्यात पन्नास लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग असणार आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य जागांची निवड, रोपवाटिकांचे नियोजन आणि वृक्ष संगोपनासाठी जबाबदारी निश्‍चित करणे यावर भर दिला जाणार असल्याचे पुजार यांनी सांगितले.

पर्यटन, शेती आणि पाणी व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये प्रभावी सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व यंत्रणांना एकत्र आणून कार्य करणार आहे. यातून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यास मदत होईल आणि विकासाला गती मिळणार असल्याचा विश्‍वास पुजार यांनी व्यक्त केला.

खाते होल्डिंगला जनधनचा पर्याय

जिल्हाधिकारी पुजार यांनी लोकशाही दिनात पीककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांची बँकेतील खाती होल्ड केल्यामुळे अशा शेतकऱ्यांना अनुदान व अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मार्ग काढला. काही जणांचे बँक खाते बँकांनी होल्ड किंवा सीझ केले असेल, तर त्यांच्या खात्यात योजनेचे मानधन किंवा सरकारी योजनेचे अनुदान जमा व्हावे यासाठी त्या नागरिकांचे जनधन खाते तत्काळ उघडण्यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकशाहीदिनी दिले आहेत. यामुळे शासनाच्या योजनेचे अनुदान त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येईल, अशी सूचनाही पुजार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com