Eco-Tourism : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये ‘इको टुरिझम’ला प्रतिसाद

Satpuda Eco-Tourism : मागील सहा महिन्यांपासून या वनक्षेत्रात पर्यटकांना चालना देण्यासाठी कामे घेतली. पाल अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे.
Satpuda Eco-Tourism
Satpuda TourismAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : पाल (ता. रावेर)मधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये गारबर्डी धरणाच्या काठावर वन विभागाने पर्यटकांसाठी फारबर कुटी अन् वन्य प्राण्यांना न्यायाळण्यासाठी व पक्षी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारले आहेत. जिल्ह्यातील पाल इको टुरिझमला गती देण्याचे काम वन्यजीव वन विभागाने हाती घेतले. त्यास पर्यटकांचा प्रतिसादही मिळाला आहे.

पाल वन्यजीव वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार धन्वंतरी परिसरात पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पर्यटकांना आता जंगल सफारीसह निरीक्षणाचा मनमुराद आनंद मिळत आहे. यात दहा बाय दहाच्या फायबर कुटीत पंखा, लाइट, गॅलरी, खिडकी, सोलर प्लेट, रात्री मुक्कामाची व्यवस्था वन विभागाने केली आहे. या कुटीत तीन ते चार नागरिक आरामात राहू शकतात. मागील सहा महिन्यांपासून या वनक्षेत्रात पर्यटकांना चालना देण्यासाठी कामे घेतली.

पाल अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे. दाटीवाटीने उभी राहिलेली झाडे आणि खानदेशासाठी पाऊस अडविणार सातपुडा पर्वत रांग डोळ्यांचे पारणे फेडत या वनसंपदेला अंगाखांद्यावर खेळवितांना दिसते. त्यामुळेच हा अभयारण्य पर्यटकांना खुणावत राहतो.

Satpuda Eco-Tourism
Satpuda Nature Safari : सातपुड्याच्या जंगलात साकारतेय प्रति ‘ताडोबा’

फायबर टेन्टचे आकर्षण

गारबर्डी धरणस्थळी प्रादेशिक वन विभागाने फायबर टेन्ट तयार केले आहेत. या ठिकाणी या कुटीजवळून धरण परिसरातील निसर्गरम्य दृश्ये पावसात पाहायला मिळतील. सलग एक महिना काम करून ही फायबर टेन्ट कुटी वन्यजीव नाशिक वन विभागाने पाल परिसरात तयार केली आहे.

या फायबर कुटीजवळच पर्यटक जेवण तयार करून या वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. हे क्षेत्र अतिशय सुंदर असून, ज्यांना वन्यजीव पाहायचे आहेत, त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पाहायचे आहेत, त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पाहायचा आहेत, त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरुड, सुतार या पक्ष्यांसह दोनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो.

Satpuda Eco-Tourism
Satpuda Greenery : सातपुड्याची हिरवळ नामशेष होण्याच्या मार्गावर

पट्टेदार वाघाचा असतो वावर

पट्टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरीण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, पिपळ, निंब, धावडा, खैर, हिरडा, बेहडा, तेदूंच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

पावसाळ्यात तर पर्वतरांगांमध्ये विसावणाऱ्या ढगांनी सातपुड्यावर धुक्याची दुलई पांघरली आहे की काय असे वाटू लागते. गारबर्डी धरण चहूबाजूंनी पाहण्यासाठी तथा पर्यटकांना धरण सरोवराचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पाच फायबर टेन्ट व उंच मनोरे बसविण्यात आले आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणी भेट दिली नसून यांनी संपूर्ण परिसर पाहण्याची सोय झाली आहे. या परिसरात विकास आराखड्यांतर्गत सातत्याने विकास कामे केली जात आहे. या ठिकाणी विविध पॉइंटवरून जंगल व पाण्याचे नैसर्गिक सौंदर्य न्यायाळण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com