Nanded DPDC : ‘डीपीडीसी’मध्ये ७४९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

District Development : पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वर्ष २०२४-२५ मध्ये झालेल्या ७४८ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपये मान्यता खर्चास मंजुरी देण्यात आली.
Atul Save
Atul SaveAgrowon
Published on
Updated on

Nanded News : पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वर्ष २०२४-२५ मध्ये झालेल्या ७४८ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपये मान्यता खर्चास मंजुरी देण्यात आली. यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२५-२६ साठी आर्थिक तरतुदीच्या विनियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी मागील बैठकीतील अनुपालनास मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २०) पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या वेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार बाबूराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे आदी उपस्थित होते.

Atul Save
Solapur DPDC : सोलापूर जिल्ह्याला २०० कोटी रुपयांचा वाढीव निधी देणार

बैठकीत सन २०२५-२६ साठी सर्वसाधारणसाठी ५८७ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना १६४ कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ६४२ कोटी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण ८१५ कोटी २० लाख २० हजार रुपये मंजूर तरतूद आहे.

Atul Save
Akola DPDC : नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्ती निधीच्या मुद्यावरून घमासान

याबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील कामाचा माहिती, प्रश्न, अडचणी पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी या वेळी यंत्रणांना सांगितले. तसेच जिल्ह्यातील काही भागात ड्रग्जस, अवैध धंदे, अंमली पदार्थाची वाहतुकीच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीतील ठळक मुद्दे

वर्ष २०२५-२६ साठी ८१५ कोटी २० लाख २० हजार मंजूर तरतूद वर्ष २०२४-२५ साठी ७४८ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपये खर्चास मान्यता स्मशानभूमीसाठी प्रत्येक आमदारांना एक कोटी रुपये निधी सर्व शासकीय कार्यालयावर सोलर पॅनेल उभारणार नुकसानग्रस्त फळपिक शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा करणार महावितरण, परिवहन विभागाच्या कामाबाबत बैठका घेऊन प्रश्‍न मार्गी लावू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com