Akola DPDC : नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्ती निधीच्या मुद्यावरून घमासान

Development Plan Akola : या मुद्यावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी जोरदार आवाज उठवत प्रश्न उपस्थित केले, तर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी त्याला उत्तर देताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा आहे.
Akola Development
Akola DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत दलित वस्ती योजनेचा ३६ कोटी रुपयांचा निधी अन्य विभागांना वळविण्याचा आणि २९ कोटी रुपये आर्थिक वर्षअखेरीस शासनात परत जाण्याच्या मुद्द्यावरून प्रचंड वादंग झाले.

या मुद्यावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी जोरदार आवाज उठवत प्रश्न उपस्थित केले, तर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी त्याला उत्तर देताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा आहे.

Akola Development
Satara DPDC : सातारा जिल्ह्यासाठी २३८.७५ कोटींच्या वाढीव आराखड्यास मंजुरी

ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. पालकमंत्री तथा कामगार मंत्री आकाश फुंडकरअध्यक्षस्थानी होते. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती योजनेतील ३६ कोटी निधी इतर कामांसाठी वळविण्यात आल्याची माहिती समोर आली.

आमदार देशमुख यांनी यासाठी जबाबदार कोण, असा थेट सवाल उपस्थित करीत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यासोबतच डीपीसीचा २९ कोटींचा निधी खर्च न होता ३१ मार्च रोजी शासनाकडे परत गेल्याची बाबही त्यांनी मांडली. या चर्चे दरम्यान देशमुख आणि सावरकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पालकमंत्री फुंडकर यांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले.

Akola Development
Solapur DPDC : सोलापूर जिल्ह्याला २०० कोटी रुपयांचा वाढीव निधी देणार

सभागृहाबाहेरही तणावपूर्ण वातावरण

सभागृहात शाब्दिक चकमकीची माहिती मिळताच दोन्ही आमदारांचे समर्थक भाजप, शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नियोजन भवनासमोर मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळ्या दिशांना उभे केले. मात्र, काही वेळाने कार्यकर्ते आमने-सामने आले आणि घोषणाबाजी सुरू झाली. जवळपास २० मिनिटे परिसरात गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

काय आहे मुद्दा ?

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्त्यांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाची विशेष योजना आहे. या योजनेंतर्गत २०२४-२५ साठी जिल्हा परिषदेकडून कामांची नियोजनपूर्वक आखणी करण्यात आली होती. समाज कल्याण सहायक आयुक्तांकडे निधीची मागणी करीत प्रस्तावही देण्यात आले होते.

मात्र, ३१ जानेवारी रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत ही कामे रद्द करण्यात आली आणि संपूर्ण निधी अन्य कामांसाठी वळविण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे खोळंबली, असा ठपका आमदार देशमुख यांनी ठेवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com