Wardha District Bank : वर्धा जिल्हा बँकेचे होणार पुनरुज्जीवन

Wardha District Bank Update : वर्धा जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनाकरिता बँकेच्या ठेवी वाढीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. मागील तीन आठवड्यात १ कोटी ५० रुपयाच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
Wardha District Bank
Wardha District BankAgrowon

Wardha News : वर्धा जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनाकरिता बँकेच्या ठेवी वाढीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. मागील तीन आठवड्यात १ कोटी ५० रुपयाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. याच्या जोडीला बँकेचे संगणकीकरण, आधुनिकीकरण, ग्राहक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

वर्धा जिल्हा सहकारी बँकेचे सक्षमीकरण व कामकाजाच्या नियमित नियंत्रणासाठी शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीची बैठक रविवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. समिती सदस्य अप्पर निबंधक संतोष पाटील, बँकेचे मुख्य प्रशासक श्री. कौशडीकर,

मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कोरडे, प्राधिकृत अधिकारी समिती सदस्य सुचिता गुघाने उपस्थित होते. मागील आठवड्यात जमा करण्यात आलेल्या ठेवींमध्ये ४२५ ठेवीदारांनी १ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. यामध्ये वैयक्तिक ठेवीदारांसोबतच सहकारी संस्था, बाजार समितीच्या ठेवींचा समावेश आहे.

Wardha District Bank
District Co-Operative Bank : नियमित कर्ज फेडा; शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्या

आर्वी बाजार समितीच्या वतीने संदीप काळे यांनी बाजार समिती, खरेदी विक्री संघ व आर्वी जिनिंग या संस्थांच्या ५ लाख रुपयांच्या ठेवी बॅंकेत जमा केल्या आहेत. खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून मुख्य बँकेसह शाखांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

बँकेच्या वीज देयकाची बचत करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून सौरऊर्जेवर वीज पुरवठा करण्यात येणार आहे. कर्ज प्रकरणे हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याने यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे कर्डिले यांनी सांगितले.

Wardha District Bank
District Cooperative Bank : बनावट प्रोसिडिंगच्या आधारे जिल्हा बँकेने बनविले ११०५ सभासद

बँकेच्या बिगर शेती कर्जदार संस्था व व्यक्तींकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या ठेवीदारांच्या ठेवींवरील चालु वर्षांचे व्याज संबंधित ठेवीदारांना मार्चपर्यंत अदा करण्याचे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बचतगट, शेतकरी गट, जीएलजी अशा घटकांना लवकरच कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.

आमदार भोयर यांची बॅंकेत ५ लाखांची ठेव

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन बॅंकेत वैयक्तिक ठेव जमा केली. बँकेतील ठेवींना विम्याचे संरक्षण असल्यामुळे ५ लक्ष रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. बँकेने शुक्रवारपासून (ता. १२) ठेवीच्या व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेत ठेवी जमा कराव्या, असे आवाहन कर्डिले यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com