Shetkari Sanvad : ‘शेतकरी संवाद’मधून रेशीम शेतीविषयी चर्चा

Sericulture Industry : रेशीम उद्योगासमोरील प्रश्न आणि समस्यांवर जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथे बुधवारी (ता. १५) चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संवाद झाला.
Shetkari Sanvad
Shetkari SanvadAgrowon

Jalna News : रेशीम उद्योगासमोरील प्रश्न आणि समस्यांवर जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथे बुधवारी (ता. १५) चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संवाद झाला. आपल्या प्रश्नांची आपणच सोडवणूक करण्याची तयारी करण्याच्या उद्देशाने अनुभवातून तांत्रिक फोरम तयार करण्याचा विचारही यावेळी पुढे आला.

जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील विजय पाटील यांच्या रेशीम उद्योगासाठीच्या चौकी सेंटरवर बुधवारी शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या शेतकरी संवादाला बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील जवळपास 300 शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी निशांत पाटील यांनी संवाद आयोजनामागील भूमिका विशद केली.

Shetkari Sanvad
Agrowon Sanvad : केळी उत्पादकाने निर्यातक्षम पीक घ्यावे

2022-23 मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान कोश न होण्यामागील कारणांवर साधक बाधक चर्चा झाली. चांगला पाला दिसत असतानाही बऱ्याच वेळा कोश उत्पादन चांगले येत नाही. यामागील कारणमीमांसा शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून व्यक्त करावी व उपाय सुचवावा, असे निशांत पाटील म्हणाले.

कचरेवाडीचे रेशीम कोष उत्पादक शेतकरी राजूभाऊ कचरे यांनी शेणखताचा वापर जास्त केल्यामुळे आपल्याला उच्च प्रतीचा पाला उपलब्ध होऊन चांगले कोष उत्पादन घेणे शक्य होत असल्याच सांगितले. तुतीसाठी योग्य खत व्यवस्थापन केल्यास दर्जेदार पाला उपलब्ध होण्यास मदत होते, असे सदाशिव गीते म्हणाले.

Shetkari Sanvad
Heavy Rain : पावसामुळे पाईट येथे घरे, पॉलिहाउसला फटका

देवगाव ता. पैठण येथील विना नांगरणी शेतीचे पुरस्कर्ते दीपक जोशी यांनी त्यांनी स्वीकारलेल्या तंत्राचा तुती लागवडीसाठी काय फायदा होऊ शकतो याविषयी विचार मांडले. सोबतच रेशीम उद्योगात तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने त्यांचा एक तांत्रिक फोरम तयार करावा त्या माध्यमातून महिन्यातून एकदा त्यांची वेगवेगळ्या भागात प्रक्षेत्र भेट ठेवावी त्यातून समस्या जाणून त्याविषयी इतर शेतकऱ्यांनी काय उपाय शोधले याचं आदान-प्रदान केलं जावं असे अपेक्षा व्यक्त केली.

परभणी जिल्ह्यातील बोरगाव चे राधेश्याम कुठे जालना जिल्ह्यातील पानेवाडीचे विश्वंभर तिडके, बीड जिल्ह्यातील राहेरीचे महादेव फलके, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगावचे शहादेव ढाकणे यांच्यासह इतर रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. शेवटी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांच्या उपस्थितीत संवाद सत्राची सांगता झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com