Dindori Lok Sabha : दिंडोरीत माजी खासदाराचा भाजपच्या डॉ. पवार यांना धक्का

Dr. Bharati Pawar : भाजपचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपसह महायुतीला धक्का बसला आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Agrowon

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपसह महायुतीला धक्का बसला आहे.

‘‘मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असूनही मला पक्षाने विचारले नाही व विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मतदार संघातील जनतेच्या आग्रहाखातर निवडणूक लढवत आहे, माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी निवडणूक लढवणारच,’’ असा निर्धार श्री. चव्हाण यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024
Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा त्यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपने डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्याने श्री. चव्हाण नाराज झाले होते.

Lok Sabha Election 2024
Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

श्री. चव्हाण यांनी कळवण येथे डॉ. पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत, पाच वर्षांत माझी आठवण झाली नाही. आता अडचणीत आल्यावरच माझी आठवण झाली का, असा सवाल त्यांनी केला होता.

डॉ. पवार यांच्याकडून मनधरणी

दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार दिनेश शर्मा यांनी श्री. चव्हाण यांच्याशी चर्चा करीत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉ. पवार यांनीही चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. परंतु, चव्हाण उमेदवारीवर ठाम राहिले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com