Agristack Scheme : ‘अॅग्रीस्टॅक’मध्ये २.४३ लाख शेतकऱ्यांची नोंदणी नाही

Farmer ID : शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रारंभ केलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत अद्यापही जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार १० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.
Farmer ID
Agristack YojanaAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : शासनाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रारंभ केलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत अद्यापही जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार १० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांना लाभांपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नोंदणीसाठी मंगळवार (ता.१५) ही अखेरची मुदत असली तरी नोंदणी करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळणार आहे. त्यासाठी त्यांना बारा अंकी युनिक फार्मर आयडी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ७५ हजार ३९७ शेतकऱ्यांना तो आतापर्यंत मिळाला आहे. फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे.

Farmer ID
Agristack Yojana : ‘ॲग्रीस्टॅक’चे घोडे अडते कुठे?

जिल्ह्यात एकूण ५ लाख १८ हजार ४०७ शेतकरी संख्या असून १ लाख ४३ हजार १० शेतकऱ्यांनी डिजिटल ओळख मिळविण्यासाठी नोंदणीच केलेली नाही. तथापि त्यांना १५ एप्रिल या मुदतीनंतरही नोंदणी करता येणार असल्याने व हंगाम प्रारंभ होण्यापूर्वी नोंदणी केल्यास लाभासाठी पात्र होता येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी स्पष्ट केले.

Farmer ID
AgriStack Registration: नांदेडला ॲग्रीस्टॅकमध्ये ५६ टक्के शेतकऱ्यांची नोंद

योजनांचा लाभ

अॅग्रीस्टॅक योजनेत सहभागी झाल्याने शेतकऱ्यांना बारा अंकी डिजिटल ओळख क्रमांक मिळणार आहे. ही डिजिटल ओळख विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामी येणार आहे. केंद्राच्या पीएम किसान व राज्याच्या नमो सन्मान, पीककर्ज, पीकविमा यासह नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी हा ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. या लाभासह शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील विविध माहिती, योजना याचीही माहिती मिळणार आहे.

फार्मर आयडी शिवाय यापुढे शेतीचे व्यवहार करता येणार नाहीत, तसेच योजनांचा लाभदेखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामापूर्वी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करून घेऊन फार्मर आयडी मिळवावा.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com