AgriStack Registration: नांदेडला ॲग्रीस्टॅकमध्ये ५६ टक्के शेतकऱ्यांची नोंद

15 April Deadline: अद्याप दोन लाख २५ हजार ६३१ शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेत नोंदणी केली नाही. या योजनेत नोंदणी केली नाही तर १५ एप्रिलनंतर कोणताही लाभ मिळणार नाही, असे कळवले आहे.
Agristack Yojana
Agristack YojanaAgrowon
Published on
Updated on

Nanded News: नांदेड जिल्ह्यात पीएम किसान योजना अंतर्गत एकूण पाच लाख पाच हजार ५८१ लाभार्थी आहेत. यापैकी केवळ दोन लाख ७९ हजार ९५० शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी झाल्यामुळे अद्याप दोन लाख २५ हजार ६३१ शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेत नोंदणी केली नाही. या योजनेत नोंदणी केली नाही तर १५ एप्रिलनंतर कोणताही लाभ मिळणार नाही, असे कळवले आहे.

पीएम किसान योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारी एक महत्त्वाची कृषी मदत योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करणे आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्नात वाढ करणे हा आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान योजनेतील लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना सध्या ॲग्रिस्टॅक या योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला नंबर मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Agristack Yojana
Agristack Yojana : अॅग्रीस्टॅकच्या नोंदणीपासून अडीच लाख शेतकरी दूरच

नांदेड जिल्ह्यात पीएम किसान योजनेत एकूण लाभार्थी संख्या पाच लाख पाच हजार ५८१ आहे. या योजनेतील शेतकरी संख्येच्या अधिक ॲग्रिस्टॅकमध्ये आजपर्यंत ५६.४८ टक्क्यांनुसार दोन लाख ७९ हजार ९५० शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली आहे. तर अद्याप दोन लाख २५ हजार ६३१ शेतकरी नोंदणीपासून दूर आहेत.

सोळा तालुक्यापैकी मुदखेडमध्ये ॲग्रिस्टॅकमध्ये केवळ ३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर लोहा ४९ टक्के, कंधार व भोकर प्रत्येकी ५० टक्के, किनवट व माहूर प्रत्येकी ५५ टक्के तर नायगाव तालुक्यातील ५६ टक्के शेतकऱ्यांनी यात नोंदणी केली आहे. उर्वरित ९ तालुक्यात साठ ते ६७ टक्क्यांवर नोंदणी झाली आहे.

Agristack Yojana
Agristack Yojana : पालघर जिल्ह्यातील गावागावांत ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यावर भर

शेतकऱ्यांच्या हितासाठी ॲग्रिस्टॅक योजना उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची डिजिटल ओळख तयार करून, त्यांना योग्य त्या शासकीय योजना, अनुदान व सल्ला वेळेवर व अचूक मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे. पीएम किसान योजनेचे लाभ घेत असलेले शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कर्डिले यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलने गरजेचे

नांदेड जिल्ह्यातील पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेच्या तत्काळ मदतीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन व कृषी विभागाने या समस्येवर तत्काळ तोडगा काढून शिल्लक असलेल्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली पाहिजेत. यामुळे भविष्यातील काळात शेतकऱ्यांना अधिक तत्पर आणि कार्यक्षम सेवांचा लाभ मिळेल याची आशा व्यक्त केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com