Fertilizer Scam : धामणगाव पाटला ३४ टन युरियाचा पकडला, गुन्हा दाखल

Fertilizer Seized : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भातरोपे टाकण्यासह खरिपाच्या पेरण्याची संधी साधून युरिया खरिपाची टंचाई निर्माण केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
Urea Fertilizer
Urea FertilizerAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : शेतकऱ्यांना खत विक्री करण्यासाठी असलेल्या ई-पॉस मशिनमध्ये फेरबदल करून शासनाची फसवणूक करत ३४ टन युरिया खताचा साठा करून ठेवल्याचे तपासणीत उघड झाले. कृषी विभागाच्या जिल्हा स्तरीय भरारी पथकाने धामणगाव पाट (ता. अकोले) येथे कारवाई करत साठा करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला. कृषी विभागाच्या पथकाने जिल्ह्यात अशा चार कारवाया केल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भातरोपे टाकण्यासह खरिपाच्या पेरण्याची संधी साधून युरिया खरिपाची टंचाई निर्माण केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. धामणगाव पाट (ता. अकोले) येथे युरिया खताचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मारदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आणि कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांच्या यांच्या पथकाने जय संतोषी माता कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून साठा करून ठेवलेले युरिया खत साठा आढळून आले.

Urea Fertilizer
Fertilizer Shortage : पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा

दुकानमालक दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्या कृषी सेवा केंद्रात साठा पुस्तक अद्ययावत नसल्याचे आढळले. तसेच खरेदी बिले नसून फक्त चलन असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणी दरम्यान युरिया खताचा साठा गोदामात नसल्याचे आढळले, मात्र ई-पॉस प्रणालीत १.९३५ टन (४३ गोणी) साठा शिल्लक असल्याचे दिसून आले.

अधिक चौकशी केली असता ई-पॉस प्रणालीत फेरबदल करून प्रत्यक्ष विक्री न करता साठा कमी केल्याचे आढळले यातूनच शासनाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. भरारी पथकाने शेजारील घराची पाहणी केली असता ३४.२४५ मे. टन (७६१ गोणी) युरिया खताचा साठा आढळून आला.

Urea Fertilizer
Fertilizer Relief: बफर स्टॉकमधून युरिया, डीएपीचा १ हजार ६६८ टन साठा खुला

हा साठा परवान्यात समाविष्ट नसलेल्या जागेत ठेवण्यात आला होता. खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत भंग केल्या प्रकरणी दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सवयीचा परिणाम थांबेना

युरियाला मागणी अधिक असल्याने खते, बियाणे, किटकनाशक औषधांची जादादराने विक्री, खतासोबत लिंकिंग करून अनावश्यक खते विक्री करण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. यंदा खताची लिंकिंग काही प्रमाणात बंद आहे. कृषी विभागानेही खते, बियाणे, कीटकनाशकांची चढ्या दराने, बनावट बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाईचा धडाका लावला आहे.

आतापर्यंत चार कारवाया झाल्या, तरीही विक्रेत्यांकडून असे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहेत. आतापर्यंत वर्षानुवर्षापासूनच्या सवयीचा तर हा परिणाम तर नाही ना अशी चर्चा आता शेतकऱ्यांत सुरू आहे.

रासायनिक खातांची कृत्रिम टंचाई करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची अडवणूक करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करत आहोत. कृषी निविष्ठा मधील गैरप्रकार दिसून आल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com